Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 1:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 म्हणजे यहूदाचा राजा आमोन ह्याचा मुलगा योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षात परमेश्वराचे वचन यीर्मयाकडे आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 यहूदाचा राजा आमोनपुत्र योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षी परमेश्वराचे वचन यिर्मयाकडे आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 यहूदीयाचा राजा आमोनाचा पुत्र योशीयाह, याच्या राजवटीच्या तेराव्या वर्षी याहवेहचे वचन यिर्मयाहकडे आले,

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 1:2
18 Iomraidhean Croise  

परमेश्वराने या संदेष्ट्याला वेदीविरुध्द बोलायची आज्ञा केली होती. त्याप्रमाणे तो म्हणाला, “हे वेदी, परमेश्वराचे म्हणणे असे आहे दाविदाच्या कुळात योशीया नावाचा पुत्र जन्माला येईल. हे याजक सध्या उंचवट्यावरील ठिकाणी पूजा करत आहेत. पण हे वेदी, योशीया त्यांचेच देह तुला अर्पण करील. योशीया त्या याजकांचा वध करील. आता ते तुझ्यावर धूप जाळत आहेत खरे पण योशीया, मानवी अस्थी तुझ्यावर जाळील. मग तू निरुपयोगी ठरशील.”


ते मेजावर बसलेले त्यास परत आणणाऱ्या संदेष्ट्याशी परमेश्वर बोलला.


मनश्शे मरण पावला आणि त्याचे आपल्या पूर्वजांच्या शेजारी दफन झाले. आपल्या घराच्या बगीच्यात त्यास पुरले. या बागेचे नाव “उज्जाची बाग” त्याच्या जागी त्याचा मुलगा आमोन राज्य करु लागला.


आणि ज्यांनी आमोनशी फितुरी केली, त्या सेवकांना देशातील लोकांनी जिवे मारले. मग आमोनचा मुलगा योशीया याला लोकांनी राजा केले.


मशुल्लामचा मुलगा असल्या याचा मुलगा शाफान चिटणीस, याला योशीया राजाने कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी परमेश्वराच्या मंदिरात पाठवले आणि सांगितले.


परमेश्वराचे वचन मजकडे आले, “यिर्मया, तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला बदामाच्या झाडाची एक शाखा दिसते.”


परमेश्वराचे वचन माझ्याजवळ आले,


यहूदाचा राजा आमोन ह्याचा मुलगा योशीया ह्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षापासून तर गेली तेवीस वर्षे परमेश्वराचे वचन माझ्याकडे येत आले आहे, मी तेव्हापासून आजपर्यंत तुम्हास ते ऐकवित आलो. पण तुम्ही ऐकले नाही आणि लक्ष दिले नाही.


जेव्हा हनन्या संदेष्ट्याने यिर्मयाच्या मानेवरून जोखड काढून तोडल्यानंतर यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले.


नंतर योशीया राजाच्या दिवसात परमेश्वर माझ्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला, इस्राएल माझ्या बाबतीत कसा अविश्वासू आहे, हे तू पाहिलेस का? एका व्यभिचारीणी प्रमाणे तिने प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्या झाडाखाली व्यभिचार केला.


तू आपणासाठी गुंडाळी घे आणि यहूदा, इस्राएल आणि इतर राष्ट्रे यांच्याविषयी मी तुला सांगितलेले सर्व वचने त्यावर लिही. योशीयाच्या दिवसापासून आतापर्यंत मी तुला सांगितलेली प्रत्येकगोष्ट लिही.


होशेय, जो बैरीचा मुलगा यास परमेश्वराचा संदेश मिळाला. त्यावेळी उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया हे यहूदाचे राजे होते आणि इस्राएलमध्ये योवाशाचा मुलगा यराबाम राज्य करीत होता.


पथूएलाचा मुलगा योएल, ह्याच्याकडे परमेश्वराचे वचन आले ते हे.


अमित्तयाचा पुत्र योना याच्याकडे परमेश्वराचे वचन आले की,


परमेश्वराचे वचन जे मीखा मोरेष्टी याजकडे, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या दिवसात त्याच्याकडे आले, जे वचन शोमरोन व यरूशलेम यांच्याविषयी होते, ते असे.


यहूदाचा राजा आमोन याचा मुलगा योशीया याच्या दिवसात, परमेश्वराचे हे वचन सफन्या जो कूशीचा मुलगा, जो गदल्याचा मुलगा, जो अमऱ्याचा मुलगा, जो हिज्कीयाचा मुलगा, याजकडे आले. ते असे,


Lean sinn:

Sanasan


Sanasan