Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यिर्मया 1:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 यास्तव, तू स्वत:ला तयार कर, उभा राहा आणि जे काही मी तुला आज्ञापीन ते त्यांना सांग, त्यांना घाबरु नकोस, जर तू त्यांना घाबरलास, तर मी तुला त्यांच्यासमोर भयभीत करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तू तर आपली कंबर कस; ऊठ, मी तुला आज्ञापितो ते सर्व त्यांना सांग; त्यांना घाबरू नकोस; घाबरलास तर मी तुला त्यांच्यापुढे घाबरवीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 “तू स्वतःला तयार कर! उठून जा आणि मी तुला सांगतो ते सर्व त्यांना सांग. त्यांना घाबरू नकोस, नाहीतर त्यांच्यासमोर मी तुला भयभीत करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यिर्मया 1:17
26 Iomraidhean Croise  

परंतु एलीयावर परमेश्वराचा हात असल्यामुळे, धावता यावे म्हणून त्याने आपले कपडे सावरून घट्ट खोचले आणि सरळ इज्रेलपर्यंत तो अहाबाच्या पुढे धावत गेला.


तेव्हा परमेश्वराचा दूत एलीयाला म्हणाला, “त्याला भिऊ नकोस, तर त्याच्याबरोबर खाली जा.” तेव्हा एलीया त्या सरदाराबरोबर राजा अहज्याला भेटायला खाली गेला.


तेव्हा अलीशा गेहजीला म्हणाला, “निघायची तयारी कर व तुझ्या हातात माझी काठी घे, आणि तिच्या घरी जा. जर तुला कोणी भेटला तर त्यास सलाम करू नको, आणि कोणी तुला सलाम केला तर त्यास उत्तर देऊ नको. आणि माझी काठी त्या मुलाच्या तोंडावर ठेव.”


अलीशाने, एका तरुण संदेष्ट्याला बोलावले. अलीशा त्यास म्हणाला, “तयार हो आणि ही तेलाची कुपी बरोबर घे. रामोथ-गिलाद येथे जा.


आता तू पुरूषासारखी आपली कंबर बांध, मी तुला प्रश्न विचारील, आणि तू मला उत्तर दे.


देवाने उत्तर दिले, “खचीत, मी तुझ्याबरोबर असेन, मी तुला पाठवत आहे याची खूण हीच असेल; तू इस्राएली लोकांस मिसरमधून बाहेर आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची उपासना कराल.”


ज्या आज्ञा मी तुला करीन त्या सर्व तू अहरोनाला सांग; मग तू इस्राएल लोकांस हा देश सोडून जाऊ दे, असे तू फारोला सांग.


पाहा, आज मी तुला मजबूत शहर व लोखंडी खांबाप्रमाणे आणि कांस्याच्या भिंतीप्रमाणे केले आहे, ह्यासाठी की तू या भूमीवरच्या सर्वांविरूद्ध यहूदाच्या राजांविरुध्द, त्याच्या अधीकाऱ्यांविरुध्द, तेथील याजकांविरूद्ध आणि लोकांविरूद्ध समर्थपणे उभे रहावे.


माझा पाठलाग करणारे लाजवले जावो, परंतू मी न लाजवला जावो. ते निराश केले जावोत, परंतू मी निराश न केला जावो. अरिष्टाचा दिवस त्यांच्याविरुद्ध पाठव आणि दुप्पट नाशाने त्यांना विखरुन टाक.


संदेष्ट्याला स्वप्न सांगायचे असेल, तर त्यास सांगू द्या. पण ज्या कोणाला मी काही घोषीत करतो, त्याने माझे वचन सत्याने सांगावे. गव्हा पुढे गवत ते काय? परमेश्वर असे म्हणतो.


मग यिर्मया यहूदाच्या अधिकाऱ्यांशी व इतर लोकांशी बोलला तो म्हणाला, “जी वचने तुम्ही ऐकली, ती या नगरीबद्दल व या मंदिराबद्दल हे भविष्य म्हणून सांगण्यासाठी परमेश्वरानेच मला पाठवले.


परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, परमेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणात उभा राहा आणि परमेश्वराच्या मंदिरात उपासना करण्यास येणाऱ्यांना हा सर्व यहूदातील नगरांना तुला त्यांच्याजवळ बोलायला आज्ञापितो ती बोल, एक शब्द कमी करु नको.


म्हणून यिर्मयाने संदेष्ट्याने नेरीयाचा मुलगा बारूख याला जे आज्ञापिले होते ती प्रत्येकगोष्ट केली. त्याने परमेश्वराची वचने त्या गुंडाळीतून मोठ्याने परमेश्वराच्या घरात वाचली.


मी तुझा धावा केला त्या दिवशी तू जवळ आलास व म्हणालास, “भिऊ नकोस.”


“ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा, आणि जो संदेश मी तुला सांगेन त्याची घोषणा कर.”


तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लागलेले असू द्या.


जे काही तुमच्या चांगल्यासाठी होते ते तुम्हास सांगण्यासाठी कोणतीही कसर ठेवली नाही, हे तुम्हास माहीत आहे आणि या गोष्टी जाहीरपणे व घराघरातून सांगण्यासाठी मी कधीही मागेपुढे पाहिले नाही.


देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रकट करण्यास मी कधीही मागेपुढे पाहिलेले नाही.


कारण जरी मी शुभवर्तमान सांगतो, तरी अभिमान मिरवण्यास मला कारण नाही कारण मला हे करणे भाग आहे; मी शुभवर्तमान सांगणार नाही, तर मला हाय.


परंतु पूर्वी फिलिप्पैत आम्ही दुःख भोगून व अपमान सोसून, हे तुम्हास माहीतच आहे, मोठा विरोध असता, देवाची सुवार्ता तुम्हास सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले.


म्हणून तुम्ही आपल्या मनाची कंबर कसून सावध रहा आणि येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी तुमच्यावर जी कृपा होणार आहे तिच्यावर पूर्ण आशा ठेवा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan