Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 13:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मी आपल्या पवित्र केलेल्यांस आज्ञा केली आहे, होय, माझ्या क्रोधास्तव मी माझ्या पराक्रमी लोकांस, तसेच गर्वाने उल्लासीत होणाऱ्या माझ्या लोकांस बोलाविले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मी आपल्या पवित्र केलेल्या जनांना आज्ञा केली आहे, माझ्या क्रोधास्तव माझ्या वीरांना, अभिमानाने उल्लास पावणार्‍या माझ्या लोकाना मी बोलावले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 ज्यांना मी युद्धासाठी सुसज्ज केले आहे, त्यांना मी आज्ञा दिली आहे. जे माझ्या विजयाचा आनंद करीत आहेत— मी माझा क्रोध अंमलात आणण्यासाठी त्या माझ्या योद्ध्यांना पाचारण केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 13:3
20 Iomraidhean Croise  

तुमच्या जवळच्या सर्व राष्ट्रांनो, त्वरा करा व या! तुम्ही स्वतः एकत्र या. हे परमेश्वरा, तुझे बलवान योध्दे उतरून येतील असे कर.


हे स्वर्गा, अहो पवित्रजनांनो, प्रेषितांनो आणि संदेष्ट्यांनो, तिच्यावरून आनंद करा, कारण देवाने तिला दंड देवून तुम्हास न्याय दिला आहे.


परमेश्वराने आपला हात समुद्रावर उगारला आहे आणि त्याने राज्ये हालवून टाकली. त्याने कनानाचे सर्व दुर्ग नष्ट करण्याची आज्ञा दिलेली आहे.


इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव करो. सियोनेचे लोक आपल्या राजाच्या ठायी आनंद करोत.


तो दूरच्या राष्ट्रांना खूण म्हणून झेंडा उंच करील आणि पृथ्वीवरच्यांसाठी तो शीळ वाजवील, पाहा ते त्वरेने आणि तातडीने येत आहेत.


म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना आणि बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, या देशाविरूद्ध आणि त्यातील सर्व राहणाऱ्यांविरूद्ध, तुझ्या भोवती असणाऱ्या राष्ट्रांविरूद्ध बोलावून घेईन. परमेश्वर असे म्हणतो, कारण मी त्यांना नाश करण्यासाठी ठेवीण. आणि त्यांना विस्मय व फूत्कार व सर्व काळ ओसाड असे करीन.


देशातील जे वर्तमान ऐकण्यात येईल त्यांने भिऊ नका अथवा आपले हृदय खचू देऊ नका. कारण एका वर्षात वर्तमान येईल. यानंतर पुढच्या वर्षात वर्तमान येईल, आणि देशात हिंसाचार होईल. राज्यकर्ते राज्यकर्त्याविरूद्ध होतील.


कारण जरी बाबेल आकाशापर्यंत वर चढली किंवा जरी तिने आपले बळाचे उंचस्थान मजबूत केले, तरी माझ्याकडून नाश करणारे तिच्यावर येतील. असे परमेश्वर म्हणतो.


प्रभू परमेश्वराच्या उपस्थितीत शांत राहा, कारण परमेश्वराच्या न्यायाचा दिवस जवळ येत आहे; कारण परमेश्वराने यज्ञाची सिध्दता केली आहे, आणि त्याने आपल्या पाहुण्यांना पवित्र केले आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan