Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 1:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 अहाहा! हे राष्ट्र, पापी, दुष्कृत्यांच्या भाराने खाली दबलेले लोक, दुष्ट जनांची संतती, भ्रष्टाचाराने वागणारी मुले! त्यांनी परमेश्वरास सोडून दिले आहे, इस्राएलाच्या पवित्र परमेश्वरास त्यांनी तुच्छ लेखले आहे. त्यांनी स्वतःस त्याच्यापासून दूर केले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 किती हे पापिष्ट राष्ट्र! दुष्कर्माने भारावलेले लोक, दुर्जनांची संतती! ही आचारभ्रष्ट मुले! ह्यांनी परमेश्वराला सोडले आहे, इस्राएलाच्या पवित्र प्रभूला तुच्छ मानले आहे; ती वियुक्त होऊन मागे फिरली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 हे पापी राष्ट्रा, तुझा धिक्कार असो, तुम्ही लोक, ज्यांचा अपराध फार मोठा आहे, वाईट कृत्ये करणाऱ्यांची पिल्ले, भ्रष्टाचारासाठी देऊन टाकलेली मुले! त्यांनी याहवेहना सोडून दिले आहे; इस्राएलच्या पवित्राला तिरस्काराने झिडकारले आहे, आणि त्यांच्याकडे पाठ फिरविली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 1:4
69 Iomraidhean Croise  

सदोम नगराचे लोक अतिशय दुष्ट असून परमेश्वराच्या विरूद्ध पाप करणारे होते.


आपल्या पूर्वजांचा परमेश्वर देव याचा मार्ग त्याने सोडला आणि परमेश्वराच्या इच्छेविरुध्द वागला.


रहबामाचे सामर्थ्य वाढले. त्याने आपले राज्य बळकट केले. पण त्याचबरोबर त्याने आणि इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन करण्याचे थांबवले.


योथाम परमेश्वराच्या दृष्टीने उचित तेच करीत असे. आपले पिता उज्जीया यांच्याप्रमाणेच तो परमेश्वराच्या आज्ञेत राहिला. पण त्याचे पिता जसे परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळायला गेले तसे मात्र त्याने केले नाही. लोकांचे वाईट मार्गाने जाणे चालूच होते.


आम्ही तुझ्या विरूद्ध अतिशय वाईट वर्तन केले आहे. तुझा सेवक मोशे याला तू दिलेल्या आज्ञा, शिकवण आणि नियम यांचे पालन आम्ही केले नाही.


दुष्ट उदरापासूनच दुरावतात; ते जन्मल्यापासूनच खोटे बोलून बहकून जातात.


मी सतारीवरही तुला धन्यवाद देईन, हे माझ्या देवा, मी तुझ्या सत्याचे स्तवन करीन; हे इस्राएलाच्या पवित्र प्रभू, मी वीणेवर तुझी स्रोत्रे गाईन.


त्यांनी किती वेळा रानात त्याच्याविरुध्द बंडखोरी केली, आणि पडिक प्रदेशात त्यांनी त्यास दु:खी केले.


पुन्हा आणि पुन्हा देवाला आव्हान केले, आणि इस्राएलाच्या पवित्र प्रभूला खूप दु:खविले.


ते आपल्या पूर्वजाप्रमाणे अविश्वासू होते आणि त्यांनी विश्वासघातकी कृत्ये केली; फसव्या धनुष्याप्रमाणे ते स्वतंत्रपणे वळणारे होते.


तर त्यांनी आपल्या पूर्वजासारखे हट्टी आणि बंडखोर पिढी होऊ नये, त्यांनी आपले अंतःकरण योग्य राखले नाही, आणि जिचा आत्मा देवाला समर्पित व प्रामाणिक नव्हता.


कारण आमची ढाल परमेश्वराची आहे; इस्राएलाचा पवित्र देव आमचा राजा आहे.


त्या वेळी परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू पर्वत उतरुन लवकर खाली जा, कारण ज्या तुझ्या लोकांस तू मिसर देशातून बाहेर आणले ते बिघडले आहेत.


तुमचे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार आहेत; प्रत्येकाला लाच घेणे प्रिय आणि नजराण्यांच्या मागे धावणे आवडते. ते अनाथांचे रक्षण करीत नाहीत किंवा विधवांची कायदेशीर दयेची बाजूही घेत नाहीत.


बंडखोर व पापी यांचा एकत्र चुराडा होईल व ज्यांनी परमेश्वराचा त्याग केला त्यांचाही तसाच चुराडा होईल.


मी त्यास उद्धट राष्ट्राविरूद्ध पाठवत आहे. आणि ज्याच्यावर माझा क्रोध काठोकाठ भरुन वाहत आहे त्यांच्याकडे पाठवत आहे. मी त्यास लूट करण्यासाठी अपहरण करण्यासाठी आणि रस्त्यावरील चिखलाप्रमाणे तुडविण्यासाठी आज्ञा करीन.


अगे सीयोन निवासिनी गजर कर आणि आनंदाने आरोळी मार, कारण इस्राएलाचा पवित्र तो तुझ्याठायी थोर आहे.”


जसे पाया खाली तुडवलेले मृत शरीर, तुला कधीच त्यांच्याबरोबर पुरण्यात येणार नाही, कारण तू आपल्या देशाचा नाश केला आहे. तू आपले लोक वधले आहेत, जे वाईट करणाऱ्यांची मुले आहेत आणि त्यांचा कधी पुन्हा उल्लेख होणार नाही.”


पीडलेले पुन्हा परमेश्वराच्या ठायी आनंद करत राहतील आणि मनुष्यातले गरीब इस्राएलाच्या पवित्राबद्दल हर्ष करतील.


कारण यरूशलेमेचा नाश झाला आहे, व यहूदा पतन पावला आहे, कारण त्यांचे बोलणे व कृती परमेश्वराच्या विरोधात आहे, त्याच्या उच्च अधिकाराचा अपमान करत आहे.


परमेश्वर असे म्हणतो, “बंडखोर मुलांना हायहाय हे. ते योजना करतात, त्या माझ्यापासून नाही; ते दुसऱ्या राष्ट्राबरोबर युती करतात, पण त्या माझ्या आत्म्याच्या मार्गदर्शनाने नाही, अशी ती पापाने पापाची भर घालतात.


कारण परमेश्वर, माझा प्रभू, इस्राएलचा पवित्र देव असे म्हणतो, “तुम्ही फिरणार आणि शांत रहाल, तर तुम्ही तराल. तुमची माझ्यामध्ये शांतता आणि विश्वास हीच शक्ती आहे.” पण तुम्ही इच्छुक नव्हते.


कारण हे बंडखोर लोक आहेत, खोटे मुले, मुले जी परमेश्वराची शिकवणूक ऐकण्यास नकार देतात.


तोही ज्ञानी आहे आणि तो संकटे आणील व आपली वचने माघारी घेणार नाही. आणि तो दुष्टांच्या घराण्याविरूद्ध आणि जे कोणी पाप करणाऱ्यांच्या मदतीविरूद्ध उठेल.


तू कोणाची निंदा आणि अपमान केलास? आणि कोणाविरूद्ध आवाज उंच केलास आणि आपले डोळे गर्वाने उंचावले? इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या विरुध्द.


हे किटका, याकोबा आणि इस्राएलाच्या मनुष्या; घाबरू नको. मी तुम्हास मदत करीन ही परमेश्वराची घोषणा आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू, तुमचा उद्धारक आहे.


तू त्यांना उफणशील आणि वारा त्यांना वाहून दूर नेईल; वावटळ त्यांना विखरील. आणि तू परमेश्वराच्या ठायी हर्ष करशील, इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या ठायी तू उत्साह करशील.


मी हे यासाठी करीन की, लोकांनी पाहावे, ओळखावे आणि एकत्रित समजावे, परमेश्वराच्या हाताने हे केले आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू ज्याने हे उत्पन्न केले आहे.


जे असे म्हणतात, “देव घाई करो, तो त्वरीत कृती करो, म्हणजे आम्ही ते झालेले पाहू, आणि इस्राएलाच्या पवित्र्याच्या योजना आकार घेऊन येवोत, म्हणजे त्या आम्ही जाणावे. त्यांना हायहाय!”


यास्तव ज्याप्रमाणे आग धसकट खाऊन टाकते आणि जसे सुके गवत आगीच्या जाळात राख होऊन पडते, त्याप्रमाणे त्यांचे मूळ कुजणार आणि त्यांचा बहर धूळीसारखा उडला जाईल. कारण त्यांनी सेनाधीश परमेश्वराची आज्ञा मानण्यास, नकार दिला आणि इस्राएलाच्या पवित्र देवाच्या संदेशाचा त्यांनी तिरस्कार केला.


कारण त्याच्या लोभाच्या अन्यायामुळे मला राग आला, आणि मी त्यास शिक्षा केली. मी आपले मुख लपवले आणि मी रागावलो. पण तरीही तो मागे हटला व आपल्या हृदयाच्या मार्गात चालत गेला.


तरी ते मला रोज शोधतात आणि माझे ज्ञानाचे मार्ग जाणून घ्यायला त्यांना आनंद होतो. अशा राष्ट्राप्रमाणे ज्याने देवाच्या आज्ञांचे पालन करण्याचे सोडले नाही आणि न्यायीपणाचा सराव केला. ते धार्मिकतेने न्याय करण्यास मला विचारतात, परमेश्वराकडे जाणे त्यांना आवडते.


“पण तुम्ही जे परमेश्वराचा त्याग करता, माझ्या पवित्र डोंगराला विसरता, जे तुम्ही गादासाठी मेज तयार करता आणि मनीसाठी मिश्रित मद्याचे प्याले भरून ठेवता.


ते असे लोक आहेत जे सतत माझे मन दुखवतात, ते बागेत यज्ञ करतात आणि विटांवर धूप जाळतात.


म्हणून त्यांच्या तरुण मनुष्यांमुळे प्रभूला संतोष होणार नाही किंवा त्यांच्या अनाथ व विधवांचा कळवळा त्यास येणार नाही, कारण प्रत्येक जन देवाला न मानणारा व वाईट करणारा आहे, आणि प्रत्येक मुख मुर्खतेच्या गोष्टी बोलते. या सर्वामुळे त्याचा क्रोध कमी होत नाही परंतु त्याचा हात फटका देण्यासाठी उगारलेला राहील.


तू मला नाकारलेस, परमेश्वर असे म्हणतो, तू माझ्यापासून मागे गेली आहेस. म्हणून मी माझ्या हाताने तुला फटकारील आणि नाश करीन. तुझ्यावर दया करून मी थकलो आहे.


कारण माझ्या लोकांनी दोन दुष्कर्मे केली आहेत. जो मी जिवंत पाण्याचा झरा त्या मला सोडून त्यांनी आपणासांठी हौद, फुकटे हौद ज्याच्याने काही पाणी धरवून ठेववत नाही ते खोदले आहेत.


तुम्ही स्वत: ला तसे केले नाही काय? जेव्हा परमेश्वर तुमचा देव तुम्हास योग्य मार्गाने घेऊन जात होता, तेव्हा तुम्हीच त्यास सोडले.


तुझे दुष्कृत्ये तुला दोष देतील आणि तुझा अविश्वासूपणा तुला शिक्षा देईल. तर आता ह्यावर विचार कर, मी, परमेश्वर तुझा देव, तू माझा त्याग केला आहे, आणि तुझ्या ठायी माझे भय नाही हे किती वाईट आणि कडू आहे!” प्रभू सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो.


जे तुम्ही या पिढीतले आहा, परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष द्या. इस्राएलाच्या लोकांस मी वाळवंटासारखा आहे का? किंवा काळोख प्रदेशासारखा त्यांना आहे काय? “आम्ही सभोवती भटकंती करू. आम्ही तुझ्याकडे येणार नाही.” ते असे का म्हणतात?


प्रिती शोधायला तू आपला मार्ग कसा चांगला करतेस, असे करून तू दुष्ट स्रियांनाही आपले मार्ग शिकवले आहेस.


परमेश्वर असे म्हणतो: “तुमच्या पूर्वजांना माझ्यामध्ये असे काय चुकीचे आढळले, जे ते माझ्यापासून दूर गेले आणि, कवडी मोल दैवतांच्या मागे जाऊन ते पण स्वत: कवडीमोल झाले?


कारण इस्राएल व यहूदातील सर्व लोकांनी, त्यांचे राजे, सरदार, याजक, संदेष्टे आणि यहूदातील प्रत्येक व्यक्तीने व यरूशलेमेत राहणाऱ्यांनी मला कोपविण्यासाठी ज्या दुष्टपणाच्या गोष्टी केल्या आहेत त्या सर्वांमुळे मी असे करीन.


“बाबेलाविरूद्ध जो कोणी त्यांचे सर्व धनुष्य वाकवणारे धनुर्धारी यांना हुकूम द्या. त्यांच्याविरुद्ध तळ द्या आणि कोणालाही निसटू देऊ नका. तिने जे काही केले त्याची परतफेड करा. तिने जे माप वापरले तिला तसेच करा. कारण तिने परमेश्वरास, इस्राएलाचा पवित्र प्रभू याची अवज्ञा केली.


कारण जरी इस्राएलाच्या पवित्र प्रभूविरूद्ध केलेल्या अपराधांनी त्यांचा देश भरून गेला आहे, तरी इस्राएलास व यहूदास, त्यांचा देव सेनाधीश परमेश्वर याने त्यांना सोडले नाही.


परमेश्वर असे म्हणतो, ते मला राग आणतात काय? “ते स्वत:लाच संताप आणत आहेत. म्हणजे त्यांच्यावर लाज यावी.


पण त्यांनी माझे ऐकले नाही, त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांनी आपली मान ताठ केली. ते त्यांच्या पूर्वजांपेक्षा अधिक दुष्ट होते


मी इस्राएल घराण्याला परत माघारी आणिन, कारण त्यांच्या मूर्तीपुढे त्यांनी मला अगदी परके केले आहे, असे परमेश्वर देव म्हणतो.


लोक प्रत्येक वेश्येला धन देतात, पण तू आपल्या जारकर्म्यांना उलट पक्षी मोबदला देतेस, तुझ्याशी वेश्या कर्म करावे म्हणून सर्व बाजूने तू त्यांना लाच देतेस.


तू आपल्या आईची मुलगी आहेस, जिने आपल्या पतीचा व लेकराचा तिरस्कार केला व तुझ्या आपल्या बहीणीने बहीणीच्या पतीच्या व तिच्या लेकरांचा तिरस्कार केला, तुझी आई हित्ती आणि तुझा बाप आमोरी आहे.


सर्व इस्राएलाने तुझी वाणी नाकारून तुझ्या नियमाशास्त्राविरोधात पाप केले आहे. देवाचा सेवक मोशे यांच्याद्वारे लिहिलेल्या शापाचा आणि शपथेचा वर्षाव आमच्यांवर झाला आहे, कारण त्याच्या विरोधात पाप केले.


आणि जे परमेश्वरास अनुसरण्यापासून मागे फिरले आहेत, आणि त्यांनी परमेश्वराचा शोध घेतला नाही व त्याचे मार्गदर्शन घेतले नाही, त्यांना मी या स्थानातून नष्ट करून टाकीन.”


आणि आता तुमच्या वाडवडिलांनी जी गोष्ट केली तीच तुम्ही करीत आहात. पाप्यांनो परमेश्वराने त्याच्या इस्राएल लोकांवर आणखी रागवावे अशी तुमची इच्छा आहे का?


अहो जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हास विसावा देईन.


तुम्ही साप व विषारी सापाची पिल्ले आहात. तुम्ही नरकाच्या शिक्षेपासून कसे पळाल?


परंतु परूशी व सदूकी यांच्यापैकी अनेक लोकांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून तो त्यांना म्हणाला, “अहो विषारी सापांच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सावध केले?


कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाशी वैर आहे; कारण ते देवाच्या नियमाला अंकित होत नाही आणि त्यास खरोखर, होता येत नाही.


आपण प्रभूला ईर्षेस पेटविण्याचा प्रयत्न करीत आहोत का? कारण तो जितका सामर्थ्यशाली आहे तितके आम्ही नाही. तुमचे स्वातंत्र्य देवाच्या गौरवासाठी उपयोगात आणा.


त्याचे उत्तर असे की, “आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याशी केलेला करार इस्राएलांनी धुडकावून लावल्यामुळे परमेश्वराचा त्यांच्यावर कोप झाला. मिसरमधून या लोकांस बाहेर आणल्यावर परमेश्वराने त्यांच्याशी पवित्र करार केला होता तो यांनी मोडला.


तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू आता लवकरच मरण पावशील व आपल्या पूर्वजांना भेटशील. तेव्हा हे लोक माझ्यापासून परावृत होतील. ते माझ्याशी केलेला पवित्र करार मोडतील. माझी साथ सोडून ते वेश्येसमान त्या देशातील इतर खोट्या दैवतांची पूजा करायला लागतील.”


परमेश्वराने हे पाहिले व आपल्या प्रजेचा धिक्कार केला. कारण प्रजेनेच त्यास चिथवले होते!


तुम्ही त्याची मुले नाहीत. तुमची पापे त्यास मळीन करतील. तुम्ही लबाड आहात.


तुमच्यासाठी या माझ्या दुःखात मी आनंद करीत आहे आणि आता, ख्रिस्ताच्या दुःखात त्याच्या शरीराकरता जे उणे आहे ते माझ्या देहात मी पुरे करीत आहे आणि त्याचे शरीर मंडळी आहे.


कारण तिची पापे आकाशापर्यंत पोहोचलीत आणि तिच्या वाईट कृतीची देवाने आठवण केली.


तेव्हा इस्राएली लोकांनी परमेश्वरास मोठ्याने आरोळी मारीत म्हटले की, “आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे; ते असे की आम्ही आपल्या देवाला सोडून बआलाच्या मूर्तींची उपासना केली.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan