Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 1:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आमोज याचा मुलगा यशया ह्याने यहूदा व यरूशलेम ह्याविषयी उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया या यहूदी राजांच्या कालकिर्दीच्या काळात पुढे घडून येणाऱ्या गोष्टींविषयीचा दृष्टांत पाहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 यहूदाचे राजे उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या काळात यहूदा व यरुशलेम ह्यांविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला झालेला दृष्टान्त.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 यहूदीयाचे राजे उज्जीयाह, योथाम, आहाज आणि हिज्कीयाहच्या शासनकाळात आमोजाचा पुत्र यशायाहने यहूदीया आणि यरुशलेम संबंधी दृष्टान्त पाहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 1:1
38 Iomraidhean Croise  

इस्राएलचा राजा यराबाम याच्या कारकिर्दीच्या सत्ताविसाव्या वर्षी यहूदाचा राजा अमस्या याचा मुलगा अजऱ्या राज्य करू लागला.


याबेशाचा मुलगा शल्लूम इस्राएलचा राजा झाला तेव्हा, यहूदाचा राजा उज्जीया याचे एकोणचाळीसावे वर्ष चालू होते. शल्लूमने शोमरोनात एक महिना राज्य केले.


रमाल्याचा मुलगा पेकह इस्राएलमध्ये राज्यावर आल्यावर त्याच्या दुसऱ्या वर्षी, यहूदाचा राजा उज्जीया याचा मुलगा योथाम यहूदावर राज्य करु लागला.


आणि अजऱ्या आपल्या पूर्वजांबरोबर निजला. त्यांनी त्यास दाविदाच्या नगरात त्याच्या पूर्वजांसोबत पूरले. त्याचा मुलगा योथाम हा त्यानंतर राजा झाला.


आणि एलाचा मुलगा होशे, जो इस्राएलाचा राजा, याच्या तिसऱ्या वर्षी यहूदाचा राजा आहाज याचा मुलगा हिज्कीया राज्य करू लागला.


त्याने आपला घरकारभारी एल्याकीम व चिटणीस शेबना आणि वडिलधारे याजक यांना गोणताट पांघरलेले असे आमोजचा मुलगा यशया या संदेष्ट्यांकडे पाठवले.


अमस्याचा पुत्र उज्जीया याला यहूदाच्या लोकांनी अमस्याच्या गादीवर बसवले. उज्जीया तेव्हा सोळा वर्षांचा होता.


उज्जीयाची इतर सर्व कृत्ये आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा याने अथपासून इथपर्यंत लिहिलेली आहेत.


योथाम राजा झाला तेव्हा पंचवीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमेवर सोळा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यरुशा ती सादोकाची कन्या.


आहाज राजा झाला तेव्हा वीस वर्षाचा होता. त्याने यरूशलेमामध्ये सोळा वर्षे राज्य केले. आपला पूर्वज दावीद वागला तसे आहाजचे वर्तन नव्हते. त्याचे आचरण परमेश्वरास मान्य होणारे नव्हते.


सहाशे बैल आणि तीन हजार शेरडेमेंढरे हे परमेश्वरास वाहिलेले पशू.


पूर्वी तू आपल्या विश्वासणाऱ्यांशी दृष्टांतात बोललास; तू म्हणालास, मी एका वीरावर मुकुट ठेवण्याचे ठरवले आहे; लोकांतून निवडलेल्या एकास मी उंचावले आहे.


आमोजाचा पुत्र यशया याने बाबेलाविषयी स्विकारलेली घोषणा.


यरूशलेम व यहूदा याविषयीच्या गोष्टी दृष्टांताद्वारे आमोज याचा मुलगा यशया यास प्राप्त झाल्या.


त्या वेळेला आमोजाचा मुलगा यशयाशी परमेश्वर बोलला आणि म्हणाला, “जा व तुझ्या कंबरे पासूनचे गोणपाटाचे वस्त्र काढून टाक व तुझ्या पायातील जोडे काढ.” त्याने तसे केले, तो नग्न व अनवाणी चालला.


दु:खदायक असा दृष्टांत मला देण्यात आला आहे, विश्वासघातकी मनुष्य विश्वासघाताने करार करतो, आणि नाश करणारा नाश करतो. हे एलामा वर जा आणि हल्ला कर, हे माद्या वेढा घाल, मी तिचे सर्व उसासे थांबवीन.


त्याने एल्याकीम जो घरावर कारभारी होता, आणि शेबना चिटणीस आणि याजकातील वडील यांना गोणपाट घातलेले असे आमोजाचा मुलगा यशया संदेष्ट्याकडे पाठवले, त्या सगळ्यांनी खास शोकप्रदर्शक कपडे घातले.


त्या दिवसात, हिज्कीया आजारी पडून मरणाच्या टोकास आला होता, आमोजाचा मुलगा यशया संदेष्टा त्याच्याकडे आला आणि त्यास म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, तुझ्या घराची व्यवस्था कर; कारण तू मरणार आहेस तू जगणार नाहीस.”


सियोनेस, सुवार्ता घेऊन येणारे जाणारे, उंच डोंगरावर चढ; यरूशलेमेस सुवार्ता सांगणाऱ्ये, आपला आवाज जोराने उंच कर. मोठ्याने आरोळी मार; घाबरू नकोस. यहूदातील नगरांना सांग, येथे तुझा देव आहे!


उज्जीया राजा मरण पावला त्या वर्षी मी प्रभूला सिहांसनावर बसलेले पाहीले; तो उंच आणि उंच चढविलेला होता; आणि त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदीर भरून गेले होते.


यहूदाचा राजा आहाज, जो योथामाचा पुत्र व योथाम हा उज्जीयाचा पुत्र, त्याच्या कारकीर्दित अरामाचा राजा रसीन व इस्राएलाचा राजा पेकह, जे रमाल्याचा पुत्र, हे यरूशलेमावर लढाई करण्याकरीता चालून गेले, परंतु त्यांची त्यावर सरशी झाली नाही.


सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “हे संदेष्टे तुम्हास जे काय भविष्य सांगतात त्याकडे लक्ष देऊ नका. त्यांनी तुम्हास भ्रमात पाडले आहे! ते त्यांच्या मनाचेच दृष्टांत सांगतात.


माझ्या आयुष्याच्या तिसाव्या वर्षाच्या चौथ्या महिन्याच्या पाचव्या दिवशी, मी खबार नदीच्या तीरी दास्यात गेलेल्या लोकांसोबत राहत होतो. तेव्हा स्वर्ग उघडला आणि मी देवाचा दृष्टांत पाहिला.


होशेय, जो बैरीचा मुलगा यास परमेश्वराचा संदेश मिळाला. त्यावेळी उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया हे यहूदाचे राजे होते आणि इस्राएलमध्ये योवाशाचा मुलगा यराबाम राज्य करीत होता.


तकोवाच्या मेंढपाळांमधला, आमोस याची ही वचने, यहूद्यांचा राजा उज्जीया आणि योवाशाचा मुलगा, इस्राएलाचा राजा यराबाम यांच्या दिवसात, भूकंपाच्या दोन वर्षे आधी इस्राएलाविषयी जी वचने दृष्टांताच्या द्वारे त्यास मिळाली ती ही आहेत.


खमिराच्या भाकरीने उपकारस्तुतीचे यज्ञ अर्पण करा; खुशीच्या अर्पणांची गोष्ट गाजवून घोषीत करा; कारण हे इस्राएलाच्या लोकांनो, हे करायला तुम्हास आवडते.” असे परमेश्वर म्हणतो.


परमेश्वराचे वचन जे मीखा मोरेष्टी याजकडे, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या दिवसात त्याच्याकडे आले, जे वचन शोमरोन व यरूशलेम यांच्याविषयी होते, ते असे.


निनवे शहराविषयीची घोषणा. एल्कोशी नहूम याच्या दृष्टांताचे पुस्तक.


परमेश्वराने मला उत्तर दिले आणि म्हटले, “मी तुला जो दृष्टांत दाखवतो, तो स्पष्टपणे पाट्यांवर लिहून ठेव अशासाठी की जो कोणी ते वाचतो त्याने धावावे!


परमेश्वर म्हणाला, “आता माझे शब्द ऐका. जेव्हा माझे संदेष्टे तुमच्याबरोबर आहेत, मी स्वतः त्यांना दृष्टांतातून प्रकट होतो, आणि त्यांच्याशी स्वप्नात बोलतो


हा संदेश जो कोणी देवाकडून ऐकतो, ज्याला परात्परापासूनचे ज्ञान आहे, ज्याला सर्वसमर्थापासून दर्शन आहे, जो डोळे उघडे ठेवून दंडवत घालतो.


जो देवाचे शब्द ऐकतो आणि बोलतो, जो सर्वसमर्थापासून दृष्टांत पाहतो, जो त्याच्यापुढे डोळे उघडे ठेवून नतमस्तक होतो.


नंतर ते डोंगरावरून खाली उतरत असताना, येशूने त्यांना आज्ञा केली की, “मनुष्याचा पुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत डोंगरावर जे पाहिले ते कोणालाही सांगू नये.”


पेत्र भयचकित होऊन या दृष्टांताचा अर्थ काय असावा याविषयी विचार करू लागला, ज्या लोकांस कर्नेल्याने पाठवले होते, त्यांना शिमोनाचे घर सापडले ते दाराजवळ उभे होते.


यासाठी, अग्रिप्पा महाराज मला जो स्वर्गीय दृष्टांत झाला, त्याचा मी आज्ञाभंग केला नाही.


मला अभिमान मिरवणे भाग पडते; तरी हे उचित नाही पण मी प्रभूच्या दर्शनांकडे व प्रकटीकरणांकडे आता वळतो.


कारण कोणत्याही काळात मनुष्यांच्या इच्छेने संदेश झाला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवाकडून आलेला संदेश दिला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan