Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 3:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 तुला माहीत आहे की, तू आपल्या बाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे. ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्याद्वारे तुला शहाणे बनवण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे; ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करायला समर्थ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 त्या कोणापासून शिकलास हे आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राचे ज्ञान आहे, हे तुला ठाऊक आहे. ते ख्रिस्त येशूवरील विश्वासामुळे तुला तारणासाठी सुज्ञ करावयाला समर्थ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 लहानपणापासूनच पवित्रशास्त्र तुला माहीत आहे. हेच पवित्रशास्त्र ख्रिस्त येशूंमधील विश्वासाच्याद्वारे परमेश्वराचे तारण स्वीकारण्यासाठी तुला सुज्ञ करते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 3:15
38 Iomraidhean Croise  

आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षीच तो आपला पूर्वज दावीद याच्या परमेश्वराच्या भजनी लागला. योशीयाने लहान वयातच हा मार्ग पत्करला आणि कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहूदा आणि यरूशलेमेला शुद्ध केले, उंचस्थाने, अशेरा देवीचे खांब, कोरीव आणि ओतीव मूर्ती यांची मोडतोड केली.


परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते जीवाला पुर्नजीवित करणारे आहे. परमेश्वराचे नियम विश्वसनीय आहेत, ज्यांना अनुभव नाही त्यांना शहाणपण देणारे आहे.


हे देवा, तू माझ्या तरुणपणापासून मला शिकवीत आला आहेस; आतासुद्धा तुझी आश्चर्यजनक कृत्ये सांगत आहे.


मुलाने ज्या मार्गात चालावे त्याचे शिक्षण त्यास दे, आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा त्या मार्गांपासून तो मागे फिरणार नाही.


माझ्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर मी प्रीती करते; आणि जे मला परिश्रमाने शोधतात, त्यांना मी सापडते.


तू आपल्या तारुण्याच्या दिवसातसुद्धा आपल्या निर्माणकर्त्याला स्मर. अनर्थाचे दिवस येण्यापूर्वी, आणि तेव्हा अशी वर्षे येण्यापूर्वी तू म्हणशील, त्यामध्ये मला काही सुख नाही.


परंतु जे सत्याच्या लेखांत लिहिले आहे ते मी तुला प्रगट करतो; आणि त्यांच्याविरुद्ध बळ धरणारा असा तुमचा अधिपती मीखाएल याच्यावाचून माझ्याबरोबर कोणी नाही.


येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात, कारण तुम्हास शास्त्रलेख व देवाचे सामर्थ्य माहीत नाही.


कारण तो परमेश्वराच्या दृष्टीने महान होईल आणि तो द्राक्षरस किंवा मद्य कधीच पिणार नाही व तो आईच्या गर्भात असतांनाच पवित्र आत्म्याने भरलेला असेल.


बालक मोठा होत गेला आणि बलवान झाला व ज्ञानातही वाढत गेला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती.


आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करून आणि सर्व संदेष्टयापर्यंत सांगून, शास्त्रलेखात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करून सांगितले.


मग ते एकमेकांना म्हणू लागले, “तो वाटेवर आपणाशी बोलत असताना व शास्त्रलेखाचा उलगडा करीत होता तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्या आत उकळी येत नव्हती काय?”


नंतर शास्त्रलेख समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली.


पण तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवत नाही, तर माझ्या वचनांवर कसा विश्वास ठेवाल?”


जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, त्यास क्षमा केली जाईल, येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तीच्या पापांची क्षमा करील, सर्व संदेष्टे हे खरे आहे असे म्हणतात.”


शास्त्रामध्ये येशूच्याबद्दल या गोष्टी लिहिल्या होत्या की, जे वाईट ते त्याच्याबाबतीत घडणारे होते, ते सर्व या यहूदी लोकांनी येशूला केले, मग त्यांनी येशूला वधस्तंभावरुन खाली घेतले व त्यास कबरेत ठेवले.


मग तो दर्बे व लुस्र येथे खाली आला; आणि पाहा, तेथे तीमथ्य नावाचा कोणीएक शिष्य होता; तो विश्वास ठेवणाऱ्या कोणाएका यहूदी स्त्रीचा मुलगा होता, त्याचा पिता हेल्लेणी होता.


तेथे पौलाने आपल्या परिपाठाप्रमाणे त्याच्याकडे जाऊन तीन शब्बाथ त्यांच्याबरोबर शास्त्रलेखावरून वादविवाद केला.


पौल आपल्या बचावासंबंधी बोलत असताना फेस्त त्यास मोठ्याने म्हणाला, “पौला, तू वेडा आहेस, जास्त ज्ञानामुळे तुला वेड लागले आहे.”


देवाने सुवार्तेविषयी आपल्या संदेष्ट्यांद्वारे पवित्र शास्त्रलेखात अगोदरच अभिवचन दिले होते;


पण आता प्रकट करण्यात आले आहे व संदेष्ट्यांच्या शास्त्रलेखावरून सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे विश्वासाच्या आज्ञापालनासाठी सर्व राष्ट्रांना कळवले आहे त्या रहस्याच्या प्रकटीकरणानुसार जो तुम्हास स्थिर करण्यास समर्थ आहे,


आणि देहाने सुंता न झालेला कोणी जर नियमशास्त्राचे पालन करीत असेल, तर ज्या तुला शास्त्रलेख व सुंताविधी मिळाले असूनही तू नियमशास्त्राचे उल्लंघन करतोस त्या तुझा तो न्याय करणार नाही काय?


म्हणून, देवाचे ज्ञान असतानाही, या जगाला स्वतःच्या ज्ञानाने देवाला ओळखता आले नाही, तेव्हा आम्ही जो “मूर्खपणाचा” संदेश गाजवितो त्यामुळे जे विश्वास ठेवणारे आहेत त्यांचे तारण करण्याचे देवाला बरे वाटले.


आणि वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका पण तुम्ही त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.


त्यांचे काटेकोरपणे पालन करा. म्हणजे तुम्ही सूज्ञ व समजूतदार आहात हे इतर देशवासीयांना कळेल. हे नियम ऐकून ते म्हणतील, खरेच, हे महान राष्ट्र बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे.


मी येईपर्यंत वाचणे, बोध करणे व शिकवणे, याकडे लक्ष्य लाव.


ख्रिस्त येशूमध्ये असलेल्या जीवनाविषयीच्या अभिवचनाची घोषणा करण्यास, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून,


तुझ्यातील निष्कपट विश्वासाची मला आठवण होते जो पहिल्यांदा तुझी आजी लोईसमध्ये होता आणि तुझी आई युनीकेमध्ये होता आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे.


आणि त्याने आपल्या सर्व पत्रांत या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये समजण्यास कठिण अशा काही गोष्टी आहेत आणि जे अशिक्षित व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा ह्यांचाहि करतात; अशाने आपल्या स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.


आणि, मी त्यास नमन करायला त्याच्या पायाशी पालथा पडलो, परंतु तो मला म्हणाला, “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर कारण येशूविषयीची साक्ष हा भविष्यवानीचा आत्मा आहे.”


परंतु शमुवेल बाळ तर तागाचे वस्त्र एफोद घालून देवाची सेवा करीत होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan