Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 3:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परंतु शेवटच्या काळामध्ये संकटाचा दिवस आपल्यावर येईल हे समजून घे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे लक्षात ठेव.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 हे लक्षात ठेव, शेवटच्या दिवसांमध्ये कठीण संकटाचे काळ येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 3:1
23 Iomraidhean Croise  

त्यानंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना आपल्याजवळ बोलावले, तो म्हणाला, “माझ्या मुलांनो, माझ्याजवळ या म्हणजे पुढील काळी तुमचे काय होईल, ते मी तुम्हास सांगतो.”


शेवटल्या दिवसात, परमेश्वराचे डोंगरावरील मंदिर, पर्वताच्या सर्वात उंच जागी स्थापण्यात येईल, आणि ते डोंगरावर उंच होईल; व सर्व राष्ट्रे त्याकडे लोटतील.


“मी पुढील दिवसात मवाबाचा बंदिवास उलटवीन” असे परमेश्वर म्हणतो. येथे मवाबाचा न्यायनिवाडा संपतो.


“शेवटल्या दिवसात असे घडेल की, मी एलामात बंदिवासात गेलेले परत आणीन,” असे परमेश्वराचे सांगणे आहे.


“तू माझ्या लोकांशी, इस्राएलशी, लढण्यास येशील. तू देशाला व्यापणाऱ्या व प्रचंड गर्जना करणाऱ्या ढगाप्रमाणे येशील. शेवटच्या दिवसात माझ्या देशाशी लढावयास मी तुला आणिन. मग, गोग, राष्ट्रांना माझे सामर्थ्य कळून येईल. ते मला मान देतील. त्यांना कळून चुकेल की मी पवित्र आहे.”


आता मी तुला हे समजविण्यास आलो आहे की, शेवटच्या दिवसात तुझ्या लोकांचे काय होणार कारण हा दृष्टांत पूर्ण होण्यास बराच वेळ आहे.


राजा मनात येईल तसे तो करील; तो आपणास इतर सर्व देवासमोर उंच आणि महान करील आणि देवा विरोधात तो धक्कादायक गोष्टी बोलेल, कोपाची पूर्णता होईपर्यंत तो बढती मिळवील जे ठरले आहे ते घडेलच.


रोजचे बलीहवन या वेळेपासून बंद करण्यात येईल आणि नाशदायी अमंगळाची स्थापना होईल तेव्हापासून 1, 290 दिवस लोटतील.


मी त्याची वाणी एकेली जो तागाची वस्त्रे घातलेला पुरुष नदीतल्या जलांच्या वरती होता, त्याने आपला उजवा व डावा हात आकाशावर करून म्हटले, जो सदाजीवी आहे त्याची शपथ वाहून म्हटले, एक समय, दोन समय आणि अर्धा समय, साडे तीन वर्ष जेव्हा पवित्रजनांच्या बलाचा चुराडा होईल तेव्हा हे पूर्ण करण्यात येईल. हे त्याचे म्हणणे माझ्या कानी पडले.


मी ती शिंगे पाहत असतांना, मग त्यांच्यातून आणखी लहान शिंगे निघाले आणि आधिच्या शिंगातून तीन मुळासह उपटली गेली मी पाहिले त्या शिंगास मानवासारखे डोळे होते आणि मोठ्या फुशारक्या मारणारे तोंड होते.


नंतर इस्राएलाचे लोक परत येतील व आपल्या देव परमेश्वर आणि राजा दावीद यांना शोधतील आणि शेवटच्या दिवसात, ते परमेश्वराच्या समोर त्याच्या चांगुलपणात भितीने कापत येतील.


परंतु नंतरच्या दिवसात असे होईल की, परमेश्वराच्या घराचा पर्वत, इतर पर्वतांवर स्थापित केला जाईल व तो डोंगरावर उंचावला जाईल. आणि लोकांचा प्रवाह त्याकडे येईल.


मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण सहन करणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील.


प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्या वासनेप्रमाणे चालणारे, थट्टाखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील,


मुलांनो, शेवट जवळ आला आहे व तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहेत आणि आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत; ह्यावरून आपल्याला दिसून येते की, ही शेवटली घटका आहे.


पण प्रियांनो, तुम्ही तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची तुम्ही आठवण करा;


त्यांनी तुम्हास म्हणले होते की, “शेवटच्या काळात टवाळखोर माणसे उठतील व आपल्या भक्तिहीन वासनांप्रमाणे चालतील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan