Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 2:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 कारण त्या सुवार्तेमुळे मी दुःख सहन करत आहे, येथपर्यंत की गुन्हेगाराप्रमाणे साखळदंडानी मला बांधण्यात आले, पण देवाचे वचन बांधले गेले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 ह्या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणार्‍यासारखा बेड्यांचेदेखील दुःख सोसत आहे; तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 ह्या शुभवर्तमानासाठी मी दुःख सोसत आहे व गुन्हेगारासारखा तुरुंगवासही भोगत आहे. परंतु देवाचा शब्द मात्र बंधनांत अडकलेला नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 या ईश्वरीय शुभवार्तेकरिता मी एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे साखळीने बांधलेला असून मला दुःख भोगावे लागत आहे, तरी परमेश्वराचे वचन साखळीने जखडलेले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 2:9
22 Iomraidhean Croise  

आणि दुसरे दोघे जण अपराधी होते त्यांनाही त्यांनी त्याच्याबरोबर जिवे मारण्यास नेले.


मग सरदार पौलाकडे आला व त्यास अटक केली व त्यास साखळ्यांनी बांधण्याची आज्ञा दिली, मग सरदाराने पौल कोण आहे व त्याने काय केले आहे याविषयी विचारले.


त्याने देवाच्या राज्याविषयी प्रचार केला, त्याने प्रभू येशूविषयी शिक्षण दिले, तो हे काम फार धैर्याने करीत असे आणि कोणीही त्यास बोलण्यात अडवू शकले नाही.


माझ्या नावाकरीता ज्या गोष्टी त्यास सहन कराव्या लागतील त्या मी त्यास दाखवून देईन,”


या कारणासाठी मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिस्थ आहे.


पण इतर आहेत ते माझी बंधने अधिक संकटाची व्हावी अशा इच्छेने तट पाडण्याकरिता दुजाभावाने ख्रिस्ताची घोषणा करतात.


आणि तुम्हा सर्वांविषयी मला असे वाटणे योग्यच आहे कारण माझ्या बंधनात आणि शुभवर्तमानासंबंधीच्या प्रत्युत्तरात व समर्थनात तुम्ही सर्व माझ्याबरोबर कृपेतील सहभागी असल्यामुळे, मी आपल्या अंतःकरणात, तुम्हास बाळगून आहे.


मी पौलाने स्वहस्ते लिहीलेला सलाम; मी बंधनात आहे याची आठवण ठेवा. तुम्हांबरोबर कृपा असो.


आणखी आम्हासाठी देखील प्रार्थना करा; अशी की, कारण ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगावयास देवाने आम्हांसाठी वचनाकरिता द्वार उघडावे.


मासेदोनिया व अखया ह्यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे; इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाची बातमीही सर्वत्र पसरली आहे; ह्यामुळे त्याविषयी आम्हास काही सांगायची गरज नाही.


शेवटी बंधूनो, आता इतकेच सांगणे आहे की, आम्हासाठी प्रार्थना करीत जा की, जशी तुमच्यामध्ये झाली त्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची लवकर प्रगती व्हावी व त्याचे गौरव व्हावे;


आणि या कारणामुळे मीसुद्धा दुःख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्यास मी ओळखतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपवले आहे त्याचे तो रक्षण करील.


अनेसिफरच्या घरावर प्रभू दया दाखवो कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे आणि माझ्या तुरूंगात असण्याची त्यास लाज वाटली नाही.


म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरु नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको. तर सुवार्तेसाठी देवाच्या सामर्थ्याप्रमाणे तू माझ्याबरोबर दुःखाचा वाटा घे.


ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस.


प्रभू माझ्या बाजूने उभा राहिला आणि मला सामर्थ्य दिले यासाठी की, माझ्याकडून संदेशाची पूर्ण घोषणा व्हावी व सर्व परराष्ट्रीयांनी ती ऐकावी आणि त्याने मला सिंहाच्या मुखातून सोडवले.


परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, म्हणजे तुम्हास दुराचरणी मानून, ते जरी तुमच्याविषयी वाईट बोलतात, तरी तुमची जी चांगली कामे त्यांना दिसतील, त्यावरून त्याच्या भेटीच्या दिवशी त्यांनी देवाचे गौरव करावे.


जे अधिकारी असतील त्यांना आज्ञांकित रहा; कारण वाईट करणार्‍यांना शिक्षा करण्यास व चांगले करणार्‍यांची प्रशंसा करण्यास ते पाठवलेले आहेत.


आणि चांगला विवेक ठेवा; म्हणजे, तुमच्याविषयी वाईट बोलत असता, ख्रिस्तातील तुमच्या चांगल्या आचरणावर खोटे आरोप करणार्‍यांना लाज वाटावी.


पण तुमच्यातील कोणी खुनी किंवा चोर म्हणून, वाईट करणारा किंवा दुसर्‍याच्या कामात लुडबुड करणारा म्हणून कोणी दुःख भोगू नये.


Lean sinn:

Sanasan


Sanasan