Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 2:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 जे मी बोलतो ते समजून घे, कारण प्रभू तुला या सर्व गोष्टींची समज देईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 जे मी बोलतो ते समजून घे; कारण प्रभू तुला सर्व गोष्टी समजावून देईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 जे मी बोलतो ते समजून घे आणि प्रभू तुला सर्व गोष्टींची समज देवो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 जे मी तुला सांगत आहे त्यावर मनन कर आणि हे समजण्यास प्रभू तुला साहाय्य करो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 2:7
40 Iomraidhean Croise  

जेव्हा इस्राएलावर तो तुला अधिकार देईल तेव्हा परमेश्वर देवाचे नियम पाळायला फक्त परमेश्वरच तुला अंर्तज्ञान आणि समजूतदारपणा देवो.


माझा पुत्र शलमोन याने तुझ्या आज्ञा, नियम आणि विधी यांचे अंतःकरणपूर्वक पालन करावे, आणि या सर्व गोष्टी कराव्या आणि ज्या मंदिराची मी तयारी केली आहे ते बांधावे.


मी तुझा सेवक आहे, मला तुझ्या कराराच्या निर्बंधाचे ज्ञान व्हावे म्हणून मला बुद्धी दे.


तुझ्या कराराचे निर्बंध सर्वकाळ न्याय्य आहेत; मला बुद्धी दे म्हणजे मी जगेन.


तुझ्या हातांनी मला निर्माण केले आणि आकार दिला; मला बुद्धी दे म्हणजे मी तुझ्या आज्ञा शिकेन.


सर्व लोक भितील आणि देवाची कृत्ये जाहीर करतील. ते सूज्ञतेने त्याने जे काही केले त्याविषयी विचार करतील.


मी ते बघितले आणि त्याचा विचार करू लागलो. व नंतर त्या गोष्टींपासून मी धडा शिकलो.


बैल आपल्या धन्याला ओळखतो, आणि गाढव आपल्या मालकाचे खाण्याचे कुंड ओळखतो, परंतु इस्राएल ओळखत नाही, इस्राएलास समजत नाही.”


कारण त्याचा देव त्यास सूचना देतो, तो त्यास सुज्ञपणे शिकवतो.


मद्य, सारंगी, डफ, बासरी आणि इतर वाद्ये यांच्या संगतीत तुम्ही मेजवान्या करता पण त्यांना परमेश्वराची कार्ये त्यांना दिसत नाहीत, किंवा त्याच्या हातची कामे ते विचारात घेत नाहीत.


मग या चार तरुणास देवाने ज्ञान आणि सर्व प्रकारच्या शास्त्रांचा समज आणि शहाणपण दिले, आणि दानीएलास सर्व प्रकारचे स्वप्न व दृष्टांत उलगडत असत.


कारण मी तुम्हास असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुध्द बोलायला मुळीच जमणार नाही.


नंतर शास्त्रलेख समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली.


“या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा कारण मनुष्याचा पुत्र मनुष्यांच्या हाती दिला जाणार आहे.”


तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हास सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हास सांगितल्या त्या सर्वाची तुम्हास आठवण करून देईल.


पण तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे ऐकेल तेच सांगेल आणि होणार्‍या गोष्टी तुम्हास कळवील.


त्याने त्यास त्याच्यावरील सर्व संकटातून सोडवले, आणि मिसर देशाचा राजा फारो याच्यासमोर त्यास कृपापात्र व ज्ञानी असे केले. म्हणून फारोने त्यास मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले.


कारण एकाला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या इच्छेप्रमाणे विद्येचे वचन दिले जाते.


ते शहाणे असते तर त्यांना समजले असते. त्यांनी पुढच्या परिणामांचा विचार केला असता.


तेव्हा, वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर परमेश्वर हाच देव आहे, दुसरा कोणीही नाही. हे आज तुम्ही नीट समजून घ्या व लक्षात ठेवा.


बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही खरे आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यावर विचार करा.


म्हणून, हे ऐकले त्या दिवसापासून, आम्हीदेखील खंड पडून देता, तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि मागतो की, तुम्हास सर्व आत्मिक ज्ञान व बुद्धी प्राप्त होऊन त्याच्या इच्छेविषयीच्या ज्ञानाने तुम्ही भरावे.


या सर्व गोष्टींकडे पूर्ण लक्ष दे, त्यामध्ये पूर्ण गढून जा. यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांस दिसून यावी.


कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे.


माझ्या सुवार्तेप्रमाणे जो मरण पावलेल्यातून उठविलेला दाविदाच्या वंशातला येशू ख्रिस्त, याची आठवण कर.


तुम्ही खचून जाऊ नये आणि धीर सोडू नये म्हणून ज्याने पापी लोकांचा इतक्या मोठ्या प्रमाणातील विरोध सहन केला, त्याचा विचार करा.


ज्यांनी तुम्हास देवाचे वचन दिले त्या पुढाऱ्यांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनातील आचार पाहा व त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.


म्हणून पवित्र बंधूनो, जे आपण स्वर्गीय पाचारणाचे भागीदार आहोत, त्यांनी येशूविषयी विचार करावा. तो देवाचा प्रेषित आणि आमच्या विश्वासाचा महायाजक आहे.


यावरुन तुम्ही ध्यानात घ्या, मलकीसदेक किती महान पुरूष होता! मूळ पुरूष अब्राहाम यानेसुद्धा आपल्या लुटीतील दहावा भाग त्यास दिला.


म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाकडे मागावे म्हणजे ते त्यास मिळेल कारण तो दोष न लावता सर्वांस उदारपणे देतो.


हे ज्ञानीपण वरून येत नाही. ते पृथ्वीवरचे, जीवधारी स्वभावाचे व सैतानाकडचे असते.


पण जे ज्ञानीपण वरून येते ते प्रथम शुद्ध, त्याशिवाय शांतीशील, सहनशील आणि विचारशील असते. ते दयेने व चांगल्या फळांनी भरलेले असते; ते निःपक्षपाती व निर्दोष असते.


पण आम्हास माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हास समजबुद्धी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्यास आम्ही ओळखावे आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan