Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 तीमथ्य 2:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 आणि सैतानाने आपल्या इच्छेप्रमाणे पकडून नेलेले त्याच्या फासातून सुटून शुद्धीवर येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 आणि सैतानाने त्यांना धरून ठेवल्यानंतर ते त्याच्या पाशातून सुटून देवाच्या इच्छेस वश होण्याकरता शुद्धीवर येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 आणि त्यानंतर सैतानाच्या पाशातून सुटून ते देवाच्या इच्छेस वश होण्याकरता भानावर येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 सैतानाने त्यांना त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी कैद करून ठेवले आहे. ते शुद्धीवर येतील आणि सैतानाच्या सापळ्यातून सुटतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 तीमथ्य 2:26
28 Iomraidhean Croise  

परमेश्वर सैतानास म्हणाला, “पाहा, त्याचे सर्व जे काही आहे ते तुझ्या अधिकारात आहे, फक्त त्यास तुझ्या हाताचा स्पर्श करू नको.” मग सैतान परमेश्वरापुढून निघून गेला.


परमेश्वर सैतानाला म्हणाला, “पाहा, तो आता तुझ्या हाती आहे, मात्र त्याचा जीव राखून ठेव.”


पक्ष्याप्रमाणे पारध्यांच्या पाशातून आमचा जीव मुक्त झाला आहे; पाश तुटून आम्ही मुक्त झालो आहोत.


लोकांस परमेश्वराचे बोलणे परक्या भाषेसारखे अनाकलनीय वाटले. हुकूमावर हुकूम, हुकूमावर हुकूम, नियमावर नियम, नियमावर नियम, थोडे इकडे, थोडे तिकडे, एक धडा तिकडे. लोकांनी स्वत:ला पाहिजे ते केले. म्हणून ते मागे पडून पराभूत झाले, ते सापळ्यात अडकले आणि पकडले गेले.


ह्यामुळेच मी त्यास त्याचा वाटा मोठ्या जमावामध्ये देईल, आणि तो अनेक बिघडलेल्याबरोबर विभागून घेईल, कारण त्याने आपले जीवन मरणापर्यंत उघडे केले आणि तो अपराध्यात गणलेला होता. त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले आणि अपराध्यांसाठी मध्यस्थी केली.


पुष्कळ लोक त्यावर ठेचा खातील, पडतील व फुटतील, पाशांत अडकून पकडल्या जातील.”


जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण शस्त्रसामग्री बाळगतो तेव्हा त्याची मालमत्ता सुरक्षित राहते.


नंतर तो शुद्धीवर आला व स्वतःशीच म्हणाला, माझ्या पित्याच्या घरी कितीतरी नोकरांना पुरुन उरेल इतके अन्न आहे आणि पाहा मी तर येथे भूकेने मरत आहे!


तसेच शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब व योहान हेही त्यांच्याप्रमाणे आश्चर्यचकित झाले. मग येशू शिमोनाला म्हणाला, “भिऊ नको, कारण येथून पुढे तू माणसे धरणारा होशील.”


शिमोनाचा पुत्र यहूदा इस्कार्योत याच्या मनात येशूला विश्वासघाताने शत्रूच्या हाती द्यावे असे सैतानाने आधीच घातले होते.


आणि घास दिल्याबरोबर सैतान त्यांच्यामध्ये शिरला. मग येशूने त्यास म्हटले, “तुला जे करावयाचे आहे ते लवकर करून टाक.”


मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारांतून निघून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.”


तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी आणि जमिनीच्या किंमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरले आहे?


नीतिमत्त्वासंबंधाने शुद्धीवर या आणि पाप करीत जाऊ नका कारण तुम्हापैकी काहीजण देवाविषयी अज्ञानी आहेत. हे मी तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो.


यासाठी सैतानाने आपल्याला ठकवू नये; कारण आपण त्याच्या दुष्ट योजना जाणत नाही असे नाही.


कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो म्हणून असे म्हणले आहे “हे झोपलेल्या जागा हो, आणि मरण पावलेल्यातून ऊठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल.”


त्याने आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून सोडवून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले आहे,


त्यामध्ये हूमनाय आणि आलेक्सांद्र आहेत त्यांना मी सैतानाच्या स्वाधीन केले आहे यासाठी की, निंदा न करण्यास शिकावे.


त्याचे बाहेरच्या लोकांमध्ये चांगले नाव असावे. यासाठी की त्याच्यावर टीका होऊ नये व त्याने सैतानाच्या जाळ्यात सापडू नये.


तो मोठा अजगर, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan