2 तीमथ्य 2:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 लोकांस या गोष्टीची आठवण करून देत राहा. देवासमोर त्यांना निक्षून ताकीद दे की, शब्दयुद्ध करू नका. असे भांडण कोणत्याही फायद्याचे नाही. जे कोणाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारण होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तू ह्या गोष्टींची त्यांना आठवण दे; त्यांना प्रभूसमोर निक्षून सांग की, शब्दयुद्ध करू नका; ते कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणार्यांच्या नाशास कारण होते. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 तू ह्या गोष्टींची त्यांना आठवण करून दे, त्यांना प्रभूसमोर निक्षून सांग की, वितंडवाद करू नका. तो कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारणीभूत ठरतो. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 परमेश्वराच्या लोकांना या गोष्टींची आठवण करून देत राहा. परमेश्वरासमोर त्यांना इशारा दे की त्यांनी शाब्दिक वाद करू नये. याचा कोणालाही फायदा होत नाही, परंतु यामुळे ऐकणार्यांचा नाश होतो. Faic an caibideil |
परमेश्वर असे म्हणतो, पाहा! मी त्या संदेष्ट्यांविरूद्ध जे फसवे स्वप्ने सांगतात, म्हणजे ते त्यांच्या खोट्या बोलण्याने व बढाईने माझ्या लोकांस चुकीच्या मार्गांने नेतात. कारण लोकांस शिकविण्यासाठी मी त्यांना पाठविलेले नाही. मी त्यांना माझ्यासाठी काही करण्याची आज्ञा कधीही दिलेली नाही. ते या लोकांस खचित मदत करु शकत नाहीत.” परमेश्वर असे म्हणतो.