Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 5:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 पण जर कोणी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकासाठी आणि विशेषतः त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे व तो अविश्वासू मनुष्यापेक्षा वाईट आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 जर कोणी स्वकीयांची व विशेषेकरून आपल्या घरच्यांची तरतूद करत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे; तो माणूस विश्वास न ठेवणार्‍या माणसापेक्षा वाईट आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 परंतु जर कोणी व्यक्ती नातलगांची व विशेषकरून आपल्या घरच्यांची देखभाल करत नसेल, तर तिने विश्वास नाकारला आहे. ती व्यक्ती विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्तींपेक्षा वाईट आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 परंतु जर कोणी आपल्या स्वकीयांचे आणि विशेषकरून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारला आहे आणि तो अविश्वासणार्‍यापेक्षा वाईट आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 5:8
19 Iomraidhean Croise  

मी येण्यापूर्वी तुम्हापाशी फार थोडी होती. आणि आता भरपूर वाढली आहेत. मी जेथे जेथे काम केले तेथे तेथे परमेश्वराने तुम्हास आशीर्वादित केले आहे. आता मी माझ्या स्वतःच्या घराची तरतूद कधी करू?”


भुकेलेल्यांना तुम्ही आपल्या घासातील घास द्यावा, बेघरांना तुमच्या घरात आसरा द्यावा, हे असे नाही काय? जेव्हा तू कोणी उघडा पाहतोस तर त्यास कपडे द्यावे, आणि आपणाला स्वतः:च्या नातेवाईकांपासून लपवून ठेवू नये.”


जर तो मनुष्य लोकांचेही ऐकणार नाही तर मंडळीलाही गोष्ट कळव. जर तो मनुष्य मंडळीचेही ऐकणार नाही, तर मग तो तुला परराष्ट्रीय किंवा एखाद्या जकातदारासारखा समज.


वाईट असूनही जर तुम्हास आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात, त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागवील?


मी जर आलो नसतो आणि त्यांच्याशी बोललो नसतो तर त्यांच्याकडे पाप नसते, पण आता त्यांना आपल्या पापाविषयी निमित्त सांगता येत नाही.


पण या ऐवजी, भाऊ भावावर फिर्याद करतो आणि तीहि अविश्वासणाऱ्या पुढे करतो हे कसे?


बघा, मी तिसर्‍या वेळी तुमच्याकडे येण्यास तयार आहे आणि तुमच्यावर भार घालणार नाही; कारण मी तुमच्यापासून काही मिळवू पाहत नाही, तर मी तुम्हास मिळवू पाहतो कारण मुलांनी आई-वडीलांसाठी साठवू नये पण आई-वडीलांनी मुलांसाठी साठवले पाहिजे.


ख्रिस्ताची बलियालाशी एकवाक्यता कशी होणार? किंवा विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार?


म्हणून आपल्याला संधी असेल तसे आपण सर्वांचे बरे करावे व विशेषतः विश्वासाने एका घराण्यात एकत्र आलेल्या विश्वास ठेवणाऱ्यांचे बरे करावे.


जर आम्ही दुःख सहन केले तर आम्ही त्याच्याबरोबर राज्यसुद्धा करू जर आम्ही त्यास नाकारले, तर तोसुध्दा आम्हास नाकारील


ते देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले राखतील परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील. त्यांच्यापासून नेहमी दूर राहा.


ते लोक ‘आम्ही देवाला ओळखतो’ असे उघड सांगतात, पण ते कृतीत त्यास नाकारतात. ते अमंगळ व अवमान करणारे आणि कोणत्याही चांगल्या कामात कसोटीस न उतरलेले आढळतात.


पण त्या लोकात खोटे संदेष्टे झाले होते, तसे तुमच्यात खोटे शिक्षकही होतील; ते आपली विघातक मते चोरून लपवून आत आणतील आणि त्यांना ज्याने विकत घेतले आहे त्या स्वामीला ते नाकारतील व तसे करून ते आपल्या स्वतःवर शीघ्र नाश ओढवून घेतील.


कारण, जे या दंडासाठी पूर्वीपासून नेमलेले, असे कित्येकजण चोरुन आत आले आहेत; ते भक्तिहीन लोक आहेत, त्यामुळे ते आपल्या देवाची कृपा पालटून तिला कामातुरपणाचे स्वरूप देवून आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात.


मला माहीत आहे जेथे सैतानाचे राजासन आहे. तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझे नाव घट्टपणे धरून राहिला आहात. जेथे सैतान राहतो तेथे माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुम्हामध्ये जिवे मारला गेला त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस.


मला तुमची कामे माहीत आहेत, पाहा मी तुमच्यासमोर द्वार उघडे करून ठेवले आहे. जे कोणीही बंद करू शकणार नाही. मला माहीत आहे की, तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझा शब्द पाळला आहेस आणि माझे नाव नाकारले नाहीस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan