Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 5:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 पण जी विधवा चैनीत राहते, ती जिवंत असता मरण पावलेली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 परंतु जी विलासी आहे ती जिवंत असून मेलेली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 परंतु जी विलासी आहे, ती जिवंत असून मेलेली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 परंतु जी विधवा विलासी आहे, ती जिवंत असून मेलेली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 5:6
29 Iomraidhean Croise  

परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नये, कारण तू ज्या दिवशी त्या झाडाचे फळ खाशील त्याच दिवशी तू नक्कीच मरशील.”


जर कोणी आपल्या दासास बालपणापासून लाडाने वाढवले तर त्याच्या शेवटी तो त्रासदायकच होईल.


परंतू त्याऐवजी, पाहा, उत्सव आणि हर्ष, बैल मारणे, मेंढरे कापणे, मांस खाणे व द्राक्षरस पिणे चालले आहे. आपण खाऊ व पिऊ, कारण उद्या आपल्याला मरायचेच आहे.


बाबेलाच्या कुमारी कन्ये, खाली ये आणि धुळीत बस; खास्द्यांच्या कन्ये, सिंहासनाशिवाय जमिनीवर बस. तुला यापुढे सुंदर आणि नाजूक म्हणणार नाहीत.


सियोनेची कन्या, जी सुंदर आणि नाजूक अशी आहे, तिचा मी नाश करणार आहे.


जे पूर्वी स्वादिष्ट अन्न खात असत, ते आता रस्त्यावर उपाशी पडले आहेत. जे किरमिजी वस्र घालत असत, त्यांनी आता उकिरड्यांचा आश्रय घेतला आहे.


येशूने त्यास म्हटले, “तू माझ्यामागे ये आणि जे मरण पावलेले आहेत त्यांना आपल्या मरण पावलेल्यांना पुरू दे.”


आणि मी माझ्या जीवाला म्हणेन, ‘हे जीवा, आता तुझ्यासाठी अनेक वर्षे पुरतील अशा पुष्कळ चांगल्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत. आराम कर, खा, पी आणि मजा कर.’


त्यानंतर काही दिवसानंतर लागलीच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला. तेथे त्याने त्याची सर्व संपत्ती चैनीत व मौजमजेचे जीवन जगून उधळून टाकली.


कारण हा माझा मुलगा मरण पावला होता पण जिवंत झाला आहे! तो हरवला होता, पण आता सापडला आहे व ते आनंद करू लागले.


परंतु आज आपण आनंद आणि उत्सव केला पाहिजे कारण हा तुझा भाऊ मरण पावला होता तो जिवंत झाला आहे. तो हरवला होता, तो सापडला आहे.”


कोणीएक श्रीमंत मनुष्य होता तो जांभळे आणि महागडे खादीचे कपडे घालीत असे. प्रत्येक दिवस तो ऐशोआरामात घालवीत असे.


तर तुम्ही काय पाहायला बाहेर गेला? मऊ वस्त्रे घातलेल्या मनुष्यास काय? पाहा, भडक पोषाख घातलेले व चैनीत असणारे लोक राजवाड्यांत असतात.


आणि तुम्ही आपले अपराध आणि पापामुळे मरण पावला होता,


आम्ही आमच्या अपराधामुळे मरण पावलेले असता त्याने आम्हास ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले. तुमचे तारण कृपेने झाले आहे.


कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो म्हणून असे म्हणले आहे “हे झोपलेल्या जागा हो, आणि मरण पावलेल्यातून ऊठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल.”


तुमच्यामधील अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाचा मनुष्यसुध्दा क्रूर बनेल, मग इतरांची काय कथा! क्रूरतेने त्याची नजर इतरांकडे वळेल. आपली प्रिय पत्नी, अजून जिवंत असलेली मुले हीसुध्दा त्यातून सुटणार नाहीत.


तुमच्यामधील अतिशय कोमल हृदयाची आणि नाजूक स्त्रीसुद्धा क्रूर बनेल. नाजुकपणाची कमाल म्हणजे आजतागायत तिने चालायला जमिनीवर पावलेही टेकवली नसतील. पण आता आपला प्राणप्रिय पती, आपली लाडकी मुले यांच्याबद्दलही ती निष्ठुर होईल.


आणि तुम्ही जे तुमच्या अपराधांमुळे व देहस्वभावाची सुंता न झाल्यामुळे मरण पावलेले होता त्या तुम्हास देवाने त्याच्याबरोबर जिवंत केले आहे. त्याने आपल्या अपराधांची क्षमा केली आहे;


मी हे म्हणतो कारण त्यांच्यांपैकी काही घरात शिरकाव करतात व पापाने भरलेल्या, सर्व प्रकारच्या वाईट अभिलाषांनी भरलेल्या, कमकुवत स्त्रियांवर ताबा मिळवतात.


जगात असताना तुम्ही चैनबाजी व विलास केला आणि मन मानेल तसे वागला. वधावयाच्या दिवासासाठी खाऊनपिऊन तयार केलेल्या सारखे तुम्ही पुष्ट झालात.


तिने स्वतःला जेवढे गौरव व ऐषोआराम दिला, तितक्या प्रमाणात तिला छळ आणि दुःख द्या; कारण ती स्वतःच्या मनात म्हणते, मी राणी होऊन बसले आहे, मी विधवा नाही, मी दुःख बघणार नाही.


सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे व सात तारे आहेत त्याचे हे शब्द आहेत. मला तुमची कामे माहीत आहेत, तू जिवंत आहेस अशी तुझी किर्ती आहे. पण तुम्ही मरण पावलेले आहात.


मग शमुवेल म्हणाला, “अमालेक्याचा राजा अगाग याला माझ्याकडे आणा.” तेव्हा अगाग डौलाने त्याच्याकडे आला, आणि अगागाने म्हटले खचित मरणाचे कडूपण निघून गेले आहे.


त्या सुखी जिवाला असे म्हणा, ‘तुला शांती असो. व तुझ्या घराला शांती असो आणि जे काही तुझे आहे त्या अवघ्याला शांती असो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan