Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 3:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्याचे बाहेरच्या लोकांमध्ये चांगले नाव असावे. यासाठी की त्याच्यावर टीका होऊ नये व त्याने सैतानाच्या जाळ्यात सापडू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये म्हणून त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांनीही चांगली साक्ष दिलेली असावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 शिवाय त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये. त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांचे चांगले मत असावे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तसेच मंडळीच्या बाहेरील लोकांचेही त्याच्याविषयी चांगले मत असावे, जेणेकरून त्याची निंदा होऊ नये आणि सैतानाच्या फासात तो पडू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 3:7
21 Iomraidhean Croise  

तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हास दिले आहे, परंतु बाहेरच्यांना सर्वकाही दाखल्यांनी सांगण्यात येते.


ती माणसे म्हणाली, “एका पवित्र देवदूताने तुम्हास आमंत्रित करण्याविषयी कर्नेल्याला सांगितले होते कर्नेल्य हा शताधिपती आहे, तो नीतिमान मनुष्य आहे तो देवाची उपासना करतो, सर्व यहूदी लोक त्याचा आदर करतात, तुम्हास घरी बोलावून तुमचे शब्द ऐकावेत असे देवदूताने त्यास सांगितले आहे.”


मग हनन्या नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता आणि तेथे राहणारे सर्व यहूदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत.


तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात, प्रतिष्ठीत पुरूष शोधून काढा, त्यांना आम्ही या कामावर नेमू.


यहूदी लोक, ग्रीक लोक किंवा देवाच्या मंडळीला अडखळण होऊ नका.


कारण जे मंडळीच्या बाहेर आहेत त्यांचा न्याय करण्याचा माझा काय संबंध? त्याऐवजी जे मंडळीत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करीत नाही काय?


या सेवेला दोष लावला जाऊ नये म्हणून आम्ही, कशात कोणाला, अडखळण्यास कारण होत नाही.


आम्ही ‘प्रभूच्या दृष्टीने जे मान्य,’ इतकेच नव्हे तर ‘मनुष्यांच्याही’ दृष्टीने जे मान्य, ते करण्याची खबरदारी घेतो.


बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञानीपणाने वागा. संधी साधून घ्या.


बाहेरच्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हास कशाचीही गरज पडू नये.


वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर रहा.


तो या कार्यात नवशिका नसावा म्हणजे तो गर्वाने फुगून सैतानाच्या दंडात पडू नये.


यासाठी माझी अशी इच्छा आहे की, तरुण विधवा स्त्रियांनी लग्न करावे. मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या विरोधकाला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये.


पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते परीक्षेत आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक अभिलाषांच्या आहारी जाऊन नाश पावतात.


आणि सैतानाने आपल्या इच्छेप्रमाणे पकडून नेलेले त्याच्या फासातून सुटून शुद्धीवर येतील.


आणि त्यांनी समंजस, शुद्धाचरणी, घर संभाळणार्‍या, ममताळू व पतीच्या अधीन राहणार्‍या व्हावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.


आणि निरपवाद चांगली शिकवण दिसू दे, म्हणजे तुझ्यावर टिका करणार्‍याला तुझ्याविषयी बोलण्यास काही वाईट न मिळून तो लज्जित व्हावा.


प्रत्येकजण देमेत्रियाविषयी चांगली साक्ष देतात व स्वतः खरेपणानेही चांगली साक्ष दिली आहे. आम्हीदेखील त्याच्याविषयी तसेच म्हणतो आणि तुम्हास माहीत आहे की, आमची साक्ष खरी आहे.


माझ्या मुलांनो असे करू, नका कारण जी बातमी मी ऐकतो ती चांगली नाही; तुम्ही परमेश्वराच्या लोकांस आज्ञाभंग करायला लावता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan