Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 2:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 त्याचप्रमाणे, माझी अशी इच्छा आहे की, स्त्रियांनी स्वतःला केस गुंफणे, सोने किंवा मोती किंवा महाग कपडे यांनी नव्हे तर सभ्य वेशाने विनयाने व मर्यादेने सुशोभित करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तसेच स्त्रियांनी स्वतःस साजेल अशा वेषाने आपणांस भीडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे; केस गुंफणे आणि सोने, मोती व मोलवान वस्त्रे ह्यांनी नव्हे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 तसेच स्त्रियांनी सभ्यतेने व समंजसपणे उचित वेशभूषा करून भिडस्तपणाने व मर्यादेने स्वतःला अलंकृत करावे. विचित्र केशभूषा, सोने, मोती व अतिमौल्यवान वस्त्रे ह्यांनी नव्हे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 स्त्रियांनीही वागणुकीत शांत, समजूतदार, आदरणीय आणि वस्त्रे प्रावरणांत संयमी असावे. वेशभूषा, सोने किंवा मोती किंवा मोलवान पोशाख यामध्ये नव्हे,

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 2:9
20 Iomraidhean Croise  

सेवकाने सोन्याचे दागिने व चांदीचे दागिने व वस्त्रे रिबकेला दिली. त्याने तिचा भाऊ व तिची आई यांनाही मोलवान देणग्या दिल्या.


येहू इज्रेलला आला ते ईजबेलने ऐकले. तिने चांगले प्रसाधन केले, केशभूषा केली आणि खिडकीत बसून बाहेर बघू लागली.


तिसऱ्या दिवशी एस्तेरने आपली राजवस्त्रे परिधान केली आणि ती राजमहालाच्या आतल्या भागात जाऊन उभी राहिली. राजमंदिरात घराच्या दरवाजासमोर राजा सिंहासनावर बसला होता.


कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे; तो दीनांना तारणाने गौरवितो.


ती आपल्या अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला तलम तागाचे जांभळे वस्त्र तयार करते.


बल व आदर तिचे वस्त्र आहेत, आणि ती येणाऱ्या काळामध्ये आनंदी राहू शकते.


आणि तेथे ती स्त्री त्यास भेटली, वेश्येसारखा पोशाख केलेली आणि ती तेथे कशासाठी आहे हे तिला माहित होते.


परमेश्वर म्हणतो सियोनेच्या कन्या अहंकारी आहेत, आणि त्या ताठ मानेने आपले डोके उंचावून चालतात व आपल्या डोळ्यांनी प्रणयचेष्टा करतात, जातांना त्या चोखंदळपणा करतात व आपल्या पायांनी पैंजणाचा रुणझुण आवाज करतात.


“ते प्राचीन ओसाड स्थले पुन्हा बांधतील, ते पूर्वी नाश झालेले पुनर्संचयित करतील, ते फार पूर्वीची मोडलेली नगरे, फार वर्षांपूर्वी नाश पावलेली शहरे नव्यासारखी करतील.”


कुमारी आपले दागिने आणि वधू आपला पोषाख विसरेल काय? पण माझे लोक मला असंख्य वेळा विसरले आहेत.


आता तू उद्ध्वस्त होशील, तेव्हा काय करशील? जरी तू किरमिजी वस्त्रे घातली, आणि सोन्याच्या दागिण्याने आपल्याला सजवतेस, जरी तू काजळ घालून डोळे मोठे करतेस, पण जे मनुष्य तुझ्याकरता वासनाधीन होते आता तुझा तिरस्कार करतात. उलट, ते तुझा जीव घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.


तुम्ही काय पाहायला गेला होता? तलम वस्त्रे घातलेल्या मनुष्यास पाहायला गेला होता काय? तलम वस्त्रे घालणारे राजाच्या घरात असतात.


तसेच देवासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या स्त्रियांना जसे शोभते, तसे स्वतःला चांगल्या कृत्यांनी सुशोभित करावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan