Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 तीमथ्य 1:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आणि आपल्याला हे ठाऊकच आहे की, नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही तर आज्ञाभंग करणाऱ्या आणि विद्रोही, पापी, भक्तिहीन, अधर्मी, अशुद्ध, वडिलांना ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यघातक

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आणि हेही ठाऊक आहे की, नियमशास्त्र नीतिमानांसाठी केलेले नाही, तर अधर्मी व अनावर, भक्तिहीन व पापी, अपवित्र व अमंगळ, बापाला ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यहत्या करणारे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 तसेच हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, नियमशास्त्र निर्दोष लोकांसाठी केलेले नाही, तर कायदा न पाळणारे व आज्ञाभंग करणारे, भक्तिहीन व पापी, अपवित्र व अमंगल, बापाला व आईला ठार मारणारे, मनुष्यहत्या करणारे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 नीतिमानांसाठी नियमशास्त्र तयार करण्यात आलेले नाही; तर आज्ञा मोडणारे, विद्रोही, भक्तिहीन व पापी, अपवित्र आणि अधर्मी, आईवडीलांवर हल्ला करणारे, आणि खून करणारे

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 तीमथ्य 1:9
45 Iomraidhean Croise  

अबीशयला आणि इतर सर्व सेवकांना राजा पुढे म्हणाला, माझा पोटचा मुलगा अबशालोमच माझ्या जिवावर उठला आहे, तर हा बन्यामिनी हे असे करत आहे तर त्यामध्ये नवल काय. त्यास हवे ते म्हणू द्या, कारण परमेश्वरानेच त्यास सांगितले असेल.


एक दिवस सन्हेरीब आपले दैवत निस्रोख याच्या देवळात पूजा करत होता. तेव्हा त्याचीच मुले अद्रम्मेलेक आणि शरेसर यांनी त्यास तलवारीने मारले. मग ते अरारात देशात निघून गेले. सन्हेरीबच्या जागी त्याचा मुलगा एसरहद्दोन राज्य करु लागला.


तेव्हा अश्शूरच्या राजाच्या छावणीवर परमेश्वराने आपला दूत पाठवला. या दूताने अश्शूरांचे सगळे सैन्य, त्यातील सरदार आणि अधिकारी यांना मारुन टाकले. एवढे झाल्यावर अश्शूरचा राजा माघार घेऊन आपल्या देशात परत गेला. त्याच्या प्रजेला त्याची शरम वाटली. राजा त्याच्या दैवताच्या देवळात गेला. तिथे त्याच्या पोटच्या पुत्रांना तलवारीने त्याने ठार केले.


खून करू नकोस.


परंतु जर कोणी एकाने जाणूनबुजून व ठरवून रागाने किंवा द्वेषाने दुसऱ्या मनुष्यास ठार मारले तर मात्र त्यास शिक्षा करावी; त्यास वेदीपासून खेचून आणून ठार मारावे.


जर एखादा मनुष्य आपल्या आईला किंवा वडिलांना शाप देईल, तर त्याचा दीप अंधारात विझून जाईल.


जर एखादा मनुष्य रक्तपाताचा अपराधी आहे तर तो शवगर्तेत आश्रय शोधेल, पण त्यास कोणीही परत आणणार नाही. आणि त्यास कोणीही मदत करणार नाही.


जो कोणी आपल्या आई वडिलांना लुटतो आणि म्हणतो “ह्यात काही पाप नाही,” पण जो कोणी नाश करतो त्याचा तो सोबती आहे.


आपल्या पित्याला शाप देणारा, आणि आपल्या आईला आशीर्वाद देत नाही अशी एक पिढी आहे,


जो डोळा पित्याची चेष्टा करतो, किंवा त्याच्या आईची आज्ञा पाळणे तुच्छ मानतो, त्यांचे डोळे खोऱ्यातले डोमकावळे टोचून बाहेर काढतील आणि त्यास गिधडाची पिल्ले खाऊन टाकतील.


कारण संदेष्टेच काय, पण याजकसुद्धा विटाळले आहेत. माझ्या मंदिरात त्यांची दुष्कृत्ये आढळली आहेत, परमेश्वर असे म्हणतो.


तू पवित्रते बद्दल अनादर दाखवला आणि दुष्ट इस्राएलचे शास्ते त्यांच्यावर शासन करण्याचा दिवस येत आहे, त्याने केलेल्या अपराधांचा समय संपला आहे.


जो मनुष्य आपल्या बापाला किंवा आपल्या आईला शिव्याशाप देईल त्यास अवश्य जिवे मारावे त्याने आपल्या बापाला व आपल्या आईला शिव्याशाप दिला आहे म्हणून त्याच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील.


भाऊ आपल्या भावाविरूद्ध व पिता आपल्या मुलाविरूद्ध उठेल आणि त्यास विश्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांवर उठून त्यांना जिवे मारण्यास देतील.


निंदक, देवद्वेष्टे, टवाळखोर, गर्विष्ठ, प्रौढी मिरवणारे, वाईट गोष्टी शोधून काढणारे, आई-वडीलांचा अवमान करणारे,


कारण तू जगाचा वारीस होशील, हे वचन अब्राहामाला किंवा त्याच्या संतानाला नियमशास्त्राच्याद्वारे नव्हते, पण विश्वासाच्या नीतिमत्त्वाच्या द्वारे होते.


शिवाय, अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्र आत आले. पण जेथे पाप वाढले तेथे कृपा अधिक विपुल झाली.


तुमच्यावर पापाची सत्ता चालणार नाही कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, पण कृपेखाली आणले गेला आहात.


तर मग नियमशास्त्र कशाला? कारण, ज्या संतानास वचन दिले होते त्याचे येणे होईपर्यंत ते उल्लंघनामुळे नियमशास्त्र देण्यात आले; ते मध्यस्थाच्या हाती देवदूतांच्याद्वारे नेमून आले.


तुम्ही देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही.


मत्सर, धुंदी, दंगल आणि ह्यांसारखी आणखी; ह्यांविषयी मी जसे पूर्वी सांगितले होते तसे आता आधी सांगतो की, या गोष्टी करणार्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.


सौम्यता, इंद्रियदमन हे आहे; अशांविरूद्ध नियमशास्त्र नाही.


“नंतर लेवींनी लोकांस सांगावे आपल्या आईवडीलांचा अनादर दाखवणारी कृत्ये करतो तो शापित असो.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन” म्हणावे.


मग तो अनीतिमान पुरूष प्रकट होईल, त्यास प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकिल आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्यास नष्ट करील;


परंतु वृद्ध स्त्रियांच्या आवडत्या अमंगळपणाच्या कथांचा स्वीकार करू नकोस, तू स्वतःला देवाच्या सुभक्तीविषयी तयार कर.


तीमथ्या, तुझ्याजवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेल्या ठेवीचे रक्षण कर. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित “विद्या” म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्परविरोधी मतांपासून दूर जा.


पण अमंगळपणाचा रिकामा वादविवाद टाळ कारण तो लोकांस देवापासून अधिकाधिक दूर नेतो.


लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदा करणारी, आई-वडीलांची आज्ञा न मानणारी, अनुपकारी, अधार्मिक


हे महत्त्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत. जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांस फसवितात. मी विशेषेकरून, जे सुंता झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे.


ते लोक ‘आम्ही देवाला ओळखतो’ असे उघड सांगतात, पण ते कृतीत त्यास नाकारतात. ते अमंगळ व अवमान करणारे आणि कोणत्याही चांगल्या कामात कसोटीस न उतरलेले आढळतात.


ज्याला नेमावयाचे तो निर्दोष असावा, एका स्त्रीचा पती असावा, त्याची मुले विश्वास ठेवणारी असून त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावी.


कारण आपणही अगोदर अविचारी, अवमान करणारे व बहकलेले होतो; नाना वासनांचे व सुखांचे दास होतो, कुवृत्तीत व मत्सरात होतो. आपण अमंगळ मानले गेलो व एकमेकांचा द्वेष करणारे होतो;


विश्वासाने राहाब वेश्या ही अवज्ञा करणार्‍या इतरांबरोबर नाश पावली नाही; कारण तिने शांतीने हेरांचे स्वागत केले होते.


कोणीही व्यभिचारी असू नये किंवा एका जेवणासाठी आपला वडील हक्क विकून टाकणाऱ्या एसावासारखे जगिक विचाराचे असू नये याकडे लक्ष द्या.


म्हणून विश्वास ठेवणार्‍या तुम्हास तो मोलवान आहे; पण, जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना ‘बांधणार्‍यांनी जो दगड नाकारला तोच कोपर्‍याचा मुख्य कोनशिला झाला आहे.’


नोहाच्या दिवसात, तारू तयार होतेवेळी, देवाची सहनशीलता प्रतीक्षा करीत असता, पूर्वी ज्यांनी अवमान केला ते हे होते. त्या तारवात केवळ थोडे, म्हणजे आठ जीव, पाण्याकडून तारले गेले.


नीतिमान जर कष्टाने तर जो भक्तिहीन व पापी ह्याला ठिकाण कोठे मिळेल?


तो सर्वांचा न्यायनिवाडा करावयास व त्यांच्यातील सर्व भक्तिहीन लोकांस, त्यांनी भक्तिहीनपणे केलेल्या भक्तिहीन कृतीविषयी आणि भक्तिहीन पाप्यांना, त्याच्याविरुध्द त्यांनी म्हटलेल्या सर्व कठोर गोष्टींविषयी दोषी ठरविण्यास येत आहे.”


पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणाऱ्या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय.”


परंतु कुत्रे, चेटकी, जादूटोणा करणारे, व्यभिचारी, मूर्तीपूजा करणारे आणि निरनिराळ्या रीतीने लबाडीची आवड धरणारे व लबाड बोलणारे बाहेर राहतील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan