Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 1:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले, हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात; तुम्ही मूर्तींपासून देवाकडे कसे वळला आणि जिवंत व खऱ्या देवाची सेवा करण्यास,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 कारण तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले हे, आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 तुमच्यामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले, याविषयी ते सर्व लोक बोलत आहेत. तसेच जिवंत व खऱ्या देवाची सेवा करण्याकरिता व

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 कारण ते स्वतः अहवाल देतील की आमचे स्वागत तुम्ही कशाप्रकारे केले आणि जे जिवंत व खरे परमेश्वर आहेत, त्यांची सेवा करण्यासाठी तुम्ही मूर्तीपासून कसे दूर झाला आहात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 1:9
30 Iomraidhean Croise  

माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला आहे. मी केव्हा देवासमोर येऊन हजर होईन?


माझ्या जिवाला परमेश्वराच्या अंगणाची खूप आतुरता लागली, असून तो अतिउत्सुकही झाला आहे; माझा जीव व देह जिवंत देवाला आरोळी मारीत आहे.


हे परमेश्वरा, कान लाव व ऐक! हे परमेश्वरा तुझे डोळे उघड आणि पाहा, आणि सन्हेरीबाचे शब्द ऐक, जी त्याने जिवंत देवाची निंदा करण्यासाठी पाठवली आहेत.


परमेश्वर तुझा देव रब-शाकेचे शब्द ऐकेल, त्याचा धनी अश्शूरचा राजा याने त्यास जिवंत देवाची निंदा करायला पाठवले आहे, आणि जे शब्द तुझा देव परमेश्वर याने ऐकली आहेत त्यांचा तो कदाचित निषेध करील, म्हणून जे उरलेले आहेत त्यांच्यासाठी आपली प्रार्थना उंच कर.


पण परमेश्वरच फक्त खरा देव आहे. तोच जिवंत आणि सार्वकालीक राजा आहे. पृथ्वी त्याच्या क्रोधाने कंपन पावते आणि त्याचा कोप राष्ट्रे सहन करु शकत नाहीत.


परमेश्वरा, तूच माझे सामर्थ्य आहेस आणि माझे संरक्षण आहेस. संकटकाळी धावत जाऊन आश्रय घ्यावा असे सुरक्षित स्थान तू आहेस. पृथ्वीच्या शेवटापासून राष्ट्रे तुझ्याकडे येतील आणि ते म्हणतील, “आमच्या वाडवडिलांना कपटाचा वारसा मिळाला आहे. जे खाली आहे, त्यामध्ये काहीच हित नाही.”


मी असे जाहीर करतो की, माझ्या साम्राज्यातील सर्व लोकांनी कंपीत होऊन दानीएलाच्या देवाचे भय धरावे; कारण तो सर्वकाळ जिवंत देव आहे. त्याचे राज्य अविनाशी आणि त्याचे प्रभूत्व अनंत आहे.


जरी इस्राएलच्या लोकांची संख्या समुद्राच्या वाळूकणांसारखी असेल जी मोजता येत नाही हे असे घडेल की, जिथे तुम्ही माझे लोक नव्हते तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र असे म्हणतील.


ते लोक परमेश्वरास घाबरतील, कारण तो पृथ्वीवरील त्यांच्या दैवतांची थट्टा करेल, सर्व लोक त्याची उपासना करतील. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी व सर्व राष्ट्रद्विपे त्याची आराधना करतील.


“कारण सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या मावळतीपर्यंत माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर होईल; प्रत्येक ठिकाणी सर्व माझ्या नावाला धूप अर्पितील व शूद्ध अर्पण करतील. कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये महान होईल.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


शिमोन पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.”


लोकांनो, या गोष्टी तुम्ही का करीत आहात? आम्ही देव नाही! तुम्हास जशा भावना आहेत, तशाच आम्हासही आहेत! आम्ही तुम्हास सुवार्ता सांगायला आलो, आम्ही तुम्हास हे सांगत आहोत की या व्यर्थ गोष्टींपासून तुम्ही तुमचे मन वळवावे, खऱ्या जिवंत देवाकडे आपले मन लावावे, त्यानेच आकाश, पृथ्वी, समुद्र व जे काही आहे ते निर्माण केले.


आणि असे होईल की त्यांना ज्याठिकाणी, तुम्ही माझी प्रजा नाही, असे म्हणले होते, तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र म्हणले जाईल.’


जेव्हा तुम्ही परराष्ट्रीय होता, तेव्हा जसे चालवले जात होता तसे तुम्ही या मुक्या मूर्तींकडे नेले जात होता. हे तुम्हास ठाऊक आहे.


साक्षात देवाला अग्नीतून बोलताना ऐकूनही नंतर जिवंत राहिला आहे, असा आमच्याखेरीज कोणीही नाही.


बंधूनो, तुम्हामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही, हे तुम्हासही माहीत आहे.


या कारणांमुळे आम्ही सुद्धा देवाची निरंतर उपकारस्तुती करितो की, तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते मनुष्यांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि खरे पहाता ते असेच आहे; ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे.


याकरिता आम्ही श्रम व खटपट करतो कारण जो सर्व लोकांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे.


परंतु तुम्ही सियोन पर्वताजवळ आणि जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरूशलेम, लाखो देवदूत


अशा प्रकारे तुम्हाला समजेल की, जिवंत देव तुमच्यामध्ये आहे, आणि कनानी, हित्ती, हिव्वी, परिज्जी, गिर्गाशी, अमोरी व यबूसी यांना तो तुमच्या समोरून घालवून देईल.


माझ्या मुलांनो, स्वतःला मूर्तीपूजेपासून दूर राखा.


पृथ्वीच्या राजांनी तिच्याबरोबर जारकर्म केले आणि पृथ्वीवर राहणारे तिच्या जारकर्माच्या द्राक्षरसाने मस्त झाले.”


तेव्हा दावीदाने आपल्याजवळ उभ्या राहिलेल्या लोकांस म्हटले, “जो मनुष्य त्या पलिष्ट्याला मारील आणि इस्राएलापासून अपमान दूर करील त्यास काय प्राप्त होईल? हा बेसुनती पलिष्टी कोण आहे की ज्याने जिवंत परमेश्वराच्या सैन्याला तुच्छ मानावे?”


तुझ्या दासाने सिंह व अस्वल दोघांनाही जीवे मारिले. हा बेसुंती पलिष्टी त्यातील एकासारखा होईल कारण, त्यांने जिवंत परमेश्वराच्या सैन्याची निंदा केली आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan