Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 थेस्सल 1:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन अंगीकारुन आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

6 तुमचा छळ होत असतानाही तुम्ही देवाचा शद्ब पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन आनंदाने स्वीकारला आणि आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झालात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 पवित्र आत्म्याने जो आनंद तुम्हाला दिला आहे, त्याद्वारे तुम्ही अतिशय क्लेशांमध्ये असतानाही संदेशाचा स्वीकार केला आणि आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाले;

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 थेस्सल 1:6
33 Iomraidhean Croise  

यास्तव, मी तिला परत मिळविन मी तिला जंगलात घेऊन जाईन, आणि प्रेमाने तिच्याशी बोलेन.


तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे.


पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”


इकडे येशूचे शिष्य आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.


ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यांत आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले.


अशाप्रकारे सर्व यहूदिया, गालील प्रांत, शोमरोन या प्रदेशातील मंडळीस तेथे शांती लाभली; आणि, मंडळी पवित्र आत्म्याच्या सांत्वनेत व परमेश्वराच्या भयात वाढत गेली.


आणि आता आशेचा देव तुम्हास तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जावे.


मी जसे ख्रिस्ताचे अनुकरण करतो तसे माझे अनुकरण करणारे व्हा.


मी तुमची प्रशंसा करतो कारण तुम्ही माझी नेहमी आठवण करता आणि मी तुम्हास नेमून दिलेले विधी, काटेकोरपणे पाळता.


यास्तव मी तुम्हास बोध करतो की माझे अनुकरण करा.


आम्ही दुःखीत, तरी सदोदित आनंद करणारे, आम्ही दरिद्री, तरी पुष्कळांना धनवान करणारे, आमच्याजवळ काही नसलेले आणि तरी सर्व असलेले असे आढळतो.


आम्हास आशा होती त्याप्रमानेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हासही दिले.


पवित्र आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,


तर मग देवाच्या प्रिय मुलांसारखे अनुकरण करणारे व्हा,


बंधूंनो, तुम्ही सर्वजण माझे अनुकरण करणारे व्हा आणि आम्ही तुम्हास कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात, त्यांच्याकडे लक्ष द्या.


ह्यावरून तुमच्या सर्व छळांत व तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखविता त्याबद्दल देवाच्या मंडळ्यांतून आम्ही स्वतः तुमचा अभिमान बाळगतो.


आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हा स्वतःला ठाऊक आहे; कारण आम्ही तुम्हामध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही;


तसा आम्हास अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हास उदाहरण घालू द्यावे म्हणून असे केले.


वचनाची घोषणा कर सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव, निषेध कर व बोध कर.


जे तुरूंगात होते त्यांना तुम्ही समदुःखी झाला आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून घेण्यात आले तरी तुम्ही आनंदी होता कारण तुमच्याजवळ अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे, हे तुम्ही जाणून होता.


आणि या कारणास्तव, आताच्या काळात, निरनिराळया प्रकारच्या परीक्षांमुळे तुम्हास थोडा वेळ भाग पडल्यास तुम्ही दुःख सोशीत असताही आनंदित होता.


तुम्ही त्यास बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्यास पाहिले नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून, तुम्ही अवर्णनीय, गौरवी आनंदाने उल्लसीत होता.


आणि तुम्ही जर चांगल्याविषयी आवेशी झाला, तर कोण तुमचे वाईट करील?


माझ्या प्रिय मित्रा, जे चांगले आहे त्याचे अनुकरण कर. वाईटाचे करू नको. चांगले करणारा देवापासून आहे, वाईट करणाऱ्याने देवाला पाहिलेले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan