Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 3:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 पण अंतःकरणात गुप्त राहणार्‍या मानवी स्वभावात, म्हणजे देवाच्या दृष्टीने बहुमोल असलेल्या, सौम्य आणि शांत आत्म्याच्या अविनाशी भूषणात ती असावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंत:करणातील गुप्त मनुष्यपणाची, अविनाशी शोभा असावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 उलट तुमचे सौंदर्य आंतरिक स्वरूपाचे म्हणजे कालातीत सौम्य व शांत वृत्ती निर्माण करणारे असावे. हे देवाच्या दृष्टीने अतिमूल्यवान असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तर याउलट ते तुमच्या अंतःकरणाच्या, न झिजणार्‍या पण सौंदर्यपूर्ण शांत आणि सौम्य आत्म्याचे असावे, जे परमेश्वराच्या दृष्टीने अति मोलवान आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 3:4
40 Iomraidhean Croise  

खरोखर मी आपला जीव निवांत व शांत ठेवला आहे; जसे दूध तुटलेले बालक आपल्या आईबरोबर असते; तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठायी आहे.


परमेश्वर जाचलेल्यास उंचावतो; तो वाईटांना खाली धुळीस मिळवतो.


कारण परमेश्वर आपल्या लोकात आनंद घेत आहे; तो दीनांना तारणाने गौरवितो.


तो नम्र जणांस न्यायाने मार्गदर्शन करतो. आणि दीनांना आपला मार्ग शिकवीतो.


राजकन्या राजमहालात तेजस्वी आहे, तिचे वस्र सोन्याच्या कारागिरीचे आहेत.


पाहा! तू माझ्या हृदयात सत्यतेची इच्छा धरतो, तू माझ्या हृदयास ज्ञानाची ओळख करून दे.


याउलट तो दीनांचा न्याय चांगुलपणाने करील व पृथ्वीवरील दिनांचा यथार्थ निर्णय करील. तो आपल्या मुख दंडाने पृथ्वीला तडाखा देईल. आणि फुंकराने दुष्टांना ठार करील.


पीडलेले पुन्हा परमेश्वराच्या ठायी आनंद करत राहतील आणि मनुष्यातले गरीब इस्राएलाच्या पवित्राबद्दल हर्ष करतील.


कारण जो उंच व परम थोर आहे, जो सदासर्वकाळ राहतो, ज्याचे नाव पवित्र आहे, तो असे म्हणतो, मी उंच आणि पवित्र जागी राहतो, नम्र जनांच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करायला, आणि पश्चातापी लोकांच्या हृदयाला पुनरुज्जीवित करायला, अनुतापी व नम्र आत्म्याचा जो आहे त्याच्याजवळही मी राहतो.


प्रभू परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे. ह्यासाठी की दिनांस सुवार्ता सांगावी आणि भग्नहृदयाच्या लोकांस बरे करावे. पाडाव केलेल्यास मुक्तता आणि बंदिवानांस मोकळीक गाजवून सांगावी.


महसेयाचा मुलगा नेरीया याचा मुलगा सारया हा जेव्हा यहूदाचा राजा सिद्कीया ह्याच्याबरोबर त्याच्या राज्याच्या चौथ्या वर्षी, बाबेलास गेला तेव्हा जे वचन यिर्मया संदेष्ट्याने त्यास आज्ञापिले ते हे. कारण सराया हा प्रमुख अधिकारी होता.


मी अंतःकरणाने लीन व नम्र आहे, म्हणून माझे जू आपणावर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल.


“सियोनेच्या कन्येला सांगा, पाहा, तुझा राज लीन होऊन गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसून तुझ्याकडे येत आहे.”


अहो परूश्यांनो, तुम्ही आंधळे आहात! अगोदर तुमची वाटी आतून घासा व धुवा म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल.


‘जे सौम्य’ ते धन्य आहेत, कारण ‘त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.’


अहो बुद्धीहीन मनुष्यांनो! ज्याने बाहेरील बाजू बनवली त्यानेच आतली बाजू बनवली नाही का?


येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही स्वतःला लोकांसमोर नीतिमान म्हणून मिरवता, पण देव तुमची अंतःकरणे ओळखतो. जे लोकांस त्यांच्या दृष्टीत महान वाटते ते देवाच्या नजरेमध्ये अमंगळ आहे.


आणि अविनाशी देवाच्या गौरवाऐवजी त्यांनी नाशवंत मनुष्य, तसेच पक्षी आणि चतुष्पाद पशू व सरपटणारे प्राणी ह्यांच्या स्वरूपाची प्रतिमा केली.


कारण जो अंतरी यहूदी आहे तो यहूदी होय आणि जी आध्यात्मिक अनुसरून आहे, शास्त्रलेखाला अनुसरून नाही, अशी जी अंतःकरणाची सुंता आहे ती सुंता होय आणि त्याची प्रशंसा मनुष्याकडून नाही परंतु देवाकडून होईल.


आपण जाणतो की आपल्यामधील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे, म्हणजे पापाचे शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये.


कारण मी माझ्या अंतर्यामी देवाच्या नियमाने आनंदित होतो;


पण जो मी, पौल, तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो पण दूर असताना तुमच्याबरोबर कडकपणे वागतो. तो मी तुम्हास ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने विनंती करतो.


म्हणून आम्ही खचत नाही. पण जरी आमचे हे बाहेरील देहपण नाश पावत आहे, तरी आमचे अंतर्याम हे दिवसानुदिवस नवीन होत आहे.


सौम्यता, इंद्रियदमन हे आहे; अशांविरूद्ध नियमशास्त्र नाही.


सर्व नम्रतेने, सौम्यतेने आणि एकमेकांना सहन करुन प्रेमाने स्वीकारा.


तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करूणायुक्त हृदय, दया, सौम्यता, लीनता व सहनशीलता धारण करा.


कारण तुम्ही मृत झला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे.


आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे शांतीने राहा. आपआपला व्यवसाय करणे आणि आपल्या हातांनी काम करणे याची आवड तुम्हास असावी.


अशा लोकांस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा व उत्तेजन देतो की, त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वतःचेच अन्न खावे.


आणि विशेषतः राजांकरता आणि जे मोठे अधिकारी आहेत त्या सर्वांकरीता प्रार्थना करा, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीत व गंभीरपणात शांतीचे व स्थिरपणाचे असे जीवन जगावे.


जे त्यास विरोध करतात, त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरेपण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चात्ताप करण्याची बुद्धी देईल.


कोणाची निंदा करू नये, भांडखोर नसावे पण सहनशील होऊन सर्वांना सर्व गोष्टींत सौम्यता दाखवावी, अशी त्यांना आठवण दे.


म्हणून तुमच्यासभोवतीच्या सर्व अमंगळ गोष्टींपासून पूर्णपणे स्वतःची सुटका करून घ्या आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंतःकरणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्वीकारा.


कारण तुम्ही नाशवंत बीजाकडून नाही पण अविनाशी बीजाकडून, म्हणजे देवाच्या, जिवंत टिकणार्‍या वचनाच्याद्वारे तुमचा पुन्हा जन्म पावलेले आहात.


पण ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना व तुमच्या आशेचे कारण विचारणार्‍या प्रत्येक मनुष्यास सौम्यतेने व आदराने प्रत्युत्तर देण्यास तुम्ही नेहमी तयार असा.


परंतु परमेश्वराने शमुवेलाला म्हटले, “की त्याच्या स्वरूपाकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको कारण मी त्यास नाकारीले आहे. जसे मनुष्य पाहतो तसे परमेश्वर पाहत नाही. कारण की, मनुष्य बाहेरील स्वरूप पाहतो परंतु परमेश्वर हृदय पाहतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan