Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 2:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 असा देखील शास्त्रलेख आहे, “अडखळण्याचा दगड व अडथळ्याचा खडक झाला आहे.” ते वचन मानीत नसल्यामुळे अडखळतात आणि त्यासाठीच ते नेमलेले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 आणि “ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला;” ते वचन मानत नसल्यामुळे ठेचाळतात, त्यासाठी ते नेमलेही होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 तसेच दुसरा धर्मशास्त्रलेख म्हणतो, हाच दगड ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक झाला. ते वचन मानीत नसल्यामुळे ठेचकाळतात. हीच त्यांच्यासाठी देवाची इच्छा होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 आणि, “लोकांना ठेच लागण्याचा एक दगड व अडखळण्याचा एक खडक ठेवतो.” ते अडखळतात, कारण ते परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालत नाहीत, ज्या शिक्षेसाठी ते पूर्वीच नेमलेले सुद्धा होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 2:8
16 Iomraidhean Croise  

तो एक पवित्रस्थान होईल; परंतु इस्राएलाच्या दोन्ही घराण्याला तो ठेच लागणारा धोंडा व अडखण्याचा खडक आणि यरूशलेमेतील रहिवाश्यास पाश व सापळा असा होईल.


परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण आणि ग्रीकांसाठी मूर्खपणा असा आहे.


म्हणून विश्वास ठेवणार्‍या तुम्हास तो मोलवान आहे; पण, जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना ‘बांधणार्‍यांनी जो दगड नाकारला तोच कोपर्‍याचा मुख्य कोनशिला झाला आहे.’


मग आपण आपला क्रोध व्यक्त करावा आणि आपले सामर्थ्य प्रकट करावे असे जरी देव इच्छीत असला, तरी त्याने जर नाशासाठी तयार केलेल्या क्रोधाच्या पात्रांना मोठ्या सहनशीलतेने वागविले,


कारण, जे या दंडासाठी पूर्वीपासून नेमलेले, असे कित्येकजण चोरुन आत आले आहेत; ते भक्तिहीन लोक आहेत, त्यामुळे ते आपल्या देवाची कृपा पालटून तिला कामातुरपणाचे स्वरूप देवून आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात.


आणि बनावट गोष्टी रचून ते लोभाने तुमच्यावर पैसे मिळवतील. त्यांच्याकरिता ठरलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करीत नाही, अणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.


कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे.


आणि शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरीया हिला म्हटले, पाहा, इस्राएलातील अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे यासाठी आणि ज्याविरूद्ध बोलतील अशा चिन्हासाठी ठेवलेला आहे.


ज्या लोकांचा नाश होत आहे, मृत्युचा मरणसूचक वास आणि जे तारले गेले आहेत, जीवनाकडे नेणारा जीवनाचा वास आहोत आणि या गोष्टींसाठी कोण लायक आहे?


परंतु मी तुला एका हेतूने ठेवले आहे की मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर विख्यात व्हावे यासाठीच मी तुला राखले आहे.


तो म्हणेल, बांधा, बांधा, रस्ता मोकळा करा, माझ्या लोकांच्या रस्त्यातील सर्व अडथळे काढून टाका.


मी हे मागच्या काळात कसे केले आणि प्राचीन दिवसात हे कसे योजिल्याप्रमाणे केले, हे तू ऐकले नाही काय? आता हे मी घडवून आणले आहे. तू अजिंक्य नगरे घटवून त्यांचे नासाडीचे ढीग करण्यास येथे आहे.


आणि बंधूंनो, मी जर अजून सुंतेचा उपदेश करीत असलो, तर अजून माझा छळ का होत आहे? मग तसे असते तर वधस्तंभाचे अडखळण नाहीसे झाले आहे.


म्हणून शास्त्रलेखातही असे आहे की, “पाहा, मी एक निवडलेला व मोलवान असलेला, कोनशिला सियोनात ठेवतो आणि जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो फजीत होणार नाही.”


कारण तो माझ्यासाठी त्याचा हूकुम चालवितो, माझ्यासाठी त्याच्या बऱ्याच योजना आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan