2-3 परमेश्वर कृपाळू आहे, असा तुम्ही अनुभव घेतला आहे तर तुम्ही त्याद्वारे तारणासाठी तुमची वाढ व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे आध्यात्मिक निऱ्या दुधाची इच्छा धरा.
2-3 ‘प्रभू कृपाळू आहे ह्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे,’ तर (तारणासाठी) तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे वचनरूपी निर्या दुधाची इच्छा धरा.
2-3 प्रभू कृपाळू आहे ह्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे, तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नव्याने जन्मलेल्या बालकासारखे निरश्या दुधाची इच्छा धरा.
देवाने माझे घराणे बळकट व सुरक्षित केले देवाने माझ्याबरोबर एक कायमचा करार केला. तो सर्व दृष्टींनी माझ्या भल्याकरताच आहे याची त्याने खातरजमा करून घेतली. त्याने असा मजबूत करार केला आणि आता तो त्याचा भंग करणार नाही. हा करार म्हणजे माझा उध्दारच होय. हा करार म्हणजेच मला हवे होते ते सर्व काही होय. परमेश्वर माझ्या घराण्याची भरभराट करील.
त्याच्या सावलीत राहणारे लोक परत येतील, ते धान्यासारखे पुनर्जिवित होतील; आणि द्राक्षाप्रमाणे फळ देतील, त्याची प्रतिष्ठा लबानोनाच्या द्राक्षरसासारखी होईल.
चला आपण परमेश्वरास ओळखू या, प्रयत्नाने त्याचे ज्ञान मिळवूया, तो खचित पहाटे सारखा उदय पावणार आहे, भूमीवर पाऊस पडतो, त्याप्रमाणे तो आमच्याकडे येणार आहे.”
“परंतु जे तुम्ही माझ्या नावाचे भय धरता त्या तुम्हासाठी न्यायीपणाचा सूर्य उगवेल. आणि त्याच्या पंखात निरोगी करण्याचा उपाय आहे. मग तुम्ही गोठ्यातून सुटलेल्या वासरांप्रमाणे, मुक्त व आनंदी व्हाल.
म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ते ह्यासाठी की जसा ख्रिस्त पित्याच्या गौरवामुळे मरण पावलेल्यांमधून उठवला गेला तसेच आपणही जीवनाच्या नवेपणात चालले पाहिजे.
बंधूनो, आम्ही सर्वदा तुम्हाविषयी देवाची उपकारस्तुती केली पाहिजे आणि हे योग्यच आहे कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकांची एकमेकांवरील प्रीती विपुल होत आहे;