Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 2:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 म्हणून तुम्ही सर्व दुष्टपणा, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे दूर ठेवून,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 म्हणून सर्व दुष्टपणा, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 तर मग सर्व दुष्टपणा, सर्व खोटारडेपणा, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे सोडून,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 यास्तव, सर्व वैरभाव आणि सर्व खोटेपणा, ढोंग, मत्सर आणि प्रत्येक प्रकारच्या दुर्भाषणाचा त्याग करा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 2:1
50 Iomraidhean Croise  

जे लोक देवाची पर्वा करीत नाहीत ते सदा कटू (रागावलेले) असतात. देवाने जरी त्यांना बांधले तरी ते देवाकडे मदत मागायला तयार नसतात.


परमेश्वर ज्याच्या ठायी काही अपराध गणत नाही, आणि ज्याच्या आत्म्यात कपट नाही तो सुखी आहे.


तर वाईट बोलण्यापासून आवर, आणि तुझे ओठ खोटे बोलण्यापासून आवर.


दुष्टकृत्ये करणाऱ्यांवर चिडू नकोस, जे अनीतीने वागतात त्यांचा हेवा करू नकोस.


कारण जेव्हा मी दुष्टांचा भरभराट पाहिला तेव्हा मी गर्विष्ठांचा मत्सर केला.


शांत अंतःकरण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात.


दुर्जनांचा मत्सर करू नकोस, आणखी त्यांच्याबरोबर मैत्रीची इच्छा धरू नकोस.


जो कोणी वाईट गोष्टी करतो त्याची काळजी करू नको, आणि दुष्टांचा मत्सर करू नको.


तू हिंसाचारी मनुष्याचा हेवा करू नको किंवा त्याचे कोणतेही मार्ग निवडू नकोस.


त्या दिवशी लोक त्यांच्या चांदीच्या व सोन्याच्या मूर्ती ज्या त्यांनी त्यांची पूजा करावयास बनविल्या त्या दूर फेकून देतील, ते त्या मूर्ती दूरवर उंदरांजवळ व वटवाघूळ यांच्याकडे फेकून देतील.


तुम्ही आपल्या चांदीच्या कोरीव मूर्तीचा मुलामा व आपल्या सोन्याच्या ओतीव मूर्तीची मढवणी तुम्ही विटाळवाल. तुम्ही त्या देवांना मासिकपाळीच्या कपड्याप्रमाणे फेकून द्याल. तुम्ही त्यांना म्हणाल, “येथून निघून जा.”


अहो ढोंग्यानो, तुम्हाविषयी यशया संदेष्ट्याने योग्य सांगितले आहे. तो म्हणतो:


तुम्ही सर्व लोकांस बाहेरून नीतिमान दिसता पण तुम्ही आतून ढोंग व दुष्टपणा यांनी भरलेले आहात.


मग मालक त्या चाकराचे तुकडे करील. त्या चाकराला मालक ढोंगी लोकांबरोबर राहायला पाठवील आणि त्याठिकाणी रडणे व दात खाणे चालेल.


अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यांतले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळयांतले कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्टपणे पाहता येईल.


परंतु येशूने त्यांचा ढोंगीपणा ओळखला व त्यांना म्हणाला, “तुम्ही माझी परीक्षा का पाहता? माझ्याकडे एक नाणे आणा म्हणजे मी ते पाहीन.”


तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही न दिसणाऱ्या कबरासारखे आहात, अशा कबरांवर लोक नकळत पाय देऊन चालतात.”


आणि त्यादरम्यान हजारो लोकांचा समुदाय जमला होता आणि एवढा की ते एकमेकांना तुडवू लागले, तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांशी बोललाः “परूश्यांच्या खमिराविषयी जपा, म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी जपा.


अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की, भाऊ, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे? अरे ढोंग्या, प्रथम तुझ्या डोळ्यातील मुसळ काढ मगच तुला तुझ्या भावाच्या डोळ्यातील कुसळ काढताना चांगले दिसेल.”


नथनेल आपल्याकडे येत आहे हे येशूने बघितले व तो म्हणाला, “पाहा, हा खरा इस्राएली आहे, याच्यात कपट नाही.”


ते सर्व प्रकारच्या अनीतीने, दुष्टतेने, लोभाने आणि कुवृत्तीने भरलेले असून मत्सर, खून, कलह, कपट, दुष्ट भाव, ह्यांनी पूर्ण भरलेले; कानगोष्टी करणारे,


बंधूनो, तुम्ही विचार करण्यात मुलासारखे असू नका. त्याऐवजी दुष्टतेच्या बाबतीत लहान बाळासारखे निरागस परंतु आपल्या विचारात प्रौढ व्हा.


तर आपण जुन्या खमिराने किंवा वाईटपणा व कुकर्माच्या खमिराने नाही, पण सरळपणा व खरेपणाच्या बेखमीर भाकरीने सण पाळू या.


कारण मला भीती वाटते की, मी येईन तेव्हा, मी अपेक्षा करीत असेन तसे, कदाचित्, तुम्ही मला आढळणार नाही; आणि तुम्ही अपेक्षा करणार नाही असा मी तुम्हास आढळेन. कदाचित्, तुमच्यात कलह, ईर्ष्या, राग, विरोध, स्वार्थी महत्त्वकांक्षा, कुरकुरी, गर्व, अफवा व गोंधळ मला आढळून येतील.


सर्व प्रकारची कटूता, संताप, राग, ओरडणे, देवाची निंदा ही सर्व प्रकारच्या दुष्टाईबरोबर तुम्हामधून दूर करावी.


कारण आमचा बोध फसवण्याने अथवा अशुद्धपणा ह्यांतून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता;


त्याचप्रमाणे, स्त्रियांनीही गंभीर असावे, त्या चहाडखोर नसाव्यात. तर सभ्य व प्रत्येक बाबतीत विश्वसनीय असाव्यात.


वृद्ध स्त्रियांनी, त्याचप्रमाणे, आपल्या आचरणात पवित्रेस शोभणाऱ्या असाव्या; चुगलखोर, मद्य पिणाऱ्या नसाव्या; चांगले शिक्षण देणार्‍या असाव्या;


म्हणून, आपण एवढया मोठया साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज अडवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.


म्हणून तुमच्यासभोवतीच्या सर्व अमंगळ गोष्टींपासून पूर्णपणे स्वतःची सुटका करून घ्या आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंतःकरणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्वीकारा.


पण तुमच्या मनात कडवट ईर्ष्या आणि स्वार्थीपणा असेल तर सत्याविरुद्ध अभिमान मिरवून खोटे बोलू नका.


बंधूंनो, एकमेकांविषयी वाईट बोलू नका. जो बंधूविषयी वाईट बोलतो व आपल्या बंधूला दोष लावतो तो नियमशास्त्राविषयी वाईट बोलतो आणि नियमशास्त्राला दोष लावतो. पण तू जर नियमशास्त्राला दोष लावलास तर तू नियम पाळणारा नाहीस पण न्यायाधीश आहेस.


किंवा ‘आपल्यात राहणारा पवित्र आत्मा ईर्षावान’, असे शास्त्रलेख व्यर्थ म्हणतो, असे तुम्हास वाटते काय?


बंधूंनो, एकमेकांविरुद्ध कुरकुर करण्याचे थांबवा, यासाठी की तुम्ही दोषी ठरू नये. पहा, न्यायाधीश दाराजवळ आत येण्यासाठी तयारीत उभा आहे.


तुम्ही स्वतंत्र आहात, परंतु वाईट प्रवृतीवर पांघरूण घालण्यास स्वातंत्र्याचा उपयोग न करता, देवाचे दास म्हणून जगावे


त्याने पाप केले नाही व त्याच्या मुखात काही कपट आढळले नाही.


कारण, “जो जीविताची आवड धरतो व चांगले दिवस बघावेत अशी इच्छा करतो त्याने वाईटापासून आपली जीभ कपटी भाषणापासून, आपले ओठ आवरावेत


म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य, मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे.


अशा बेतालपणाच्या स्वैराचरणात आता तुम्ही त्यांच्याबरोबर घुसत नाही, ह्याचे त्यांना नवल वाटून ते तुमची निंदा करतात.


त्यांच्या मुखात काही असत्य आढळले नाही; ते निष्कलंक आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan