Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




1 पेत्र 1:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याजकडून, पंत, गलतीया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया या प्रांतात उपरी म्हणून पांगलेल्या देवाच्या लोकांस पत्र,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया ह्यांत पांगलेल्या (यहूदी) लोकांतील,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

1 येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याच्याकडून पंत, गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया ह्या प्रांतांत हद्दपार केलेल्या, देवाच्या निवडलेल्या लोकांना:

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 पेत्र, येशू ख्रिस्ताच्या प्रेषिताकडून, पंत, गलातीया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया या प्रांतात हद्दपार होऊन विखुरलेल्या आणि परमेश्वराच्या निवडलेल्यांना,

Faic an caibideil Dèan lethbhreac




1 पेत्र 1:1
34 Iomraidhean Croise  

मग हामान राजा अहश्वेरोशकडे येऊन म्हणाला, राजा अहश्वेरोश, तुझ्या साम्राज्यात सर्व प्रांतांमध्ये विशिष्ट गटाचे लोक विखरलेले व पांगलेले आहेत. इतरांपेक्षा त्यांचे कायदे वेगळे आहेत. शिवाय ते राजाचे कायदे पाळत नाहीत. म्हणून त्यांना राज्यात राहू देणे राजाच्या हिताचे नाही.


तू आम्हास भक्ष्याकरता योजलेल्या मेंढ्यासारखे केले आहे, आणि आम्हास देशात विखरून टाकले आहेस.


तरी उरलेल्यांचा मी बचाव करेन, देशातून काहींचा बचाव तलवारीपासून होईल, जेव्हा देशातून तुमची पांगापांग होईल.


परराष्ट्रांमध्ये मी तुमची पांगापांग करीन; मी माझी तलवार उपसून तुमच्या पाठीस लागेन. तुमच्या देशाचा नाश होईल आणि तुमची शहरे ओसाड पडतील.


तर त्या बारा प्रेषितांची नावे ही होती: पेत्र (ज्याला शिमोन म्हणत) आणि त्याचा भाऊ अंद्रिया, जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान


आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीही मनुष्य वाचला नसता. परंतु त्याच्या निवडलेल्यांसाठी तो ते दिवस थोडे करील.


नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता, पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना त्याने जाळे टाकतांना पाहिले कारण ते मासे पकडणारे होते.


आणि मग जे देवाचे निवडलेले लोक दिवसरात्र त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? तो त्यांना मदत करण्यास वेळ लावेल का?


आणि केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही, तर यासाठी की त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांसही एकत्र जमवून एक करावे.


यामुळे यहूदी आपसात म्हणाले, “हा आपल्याला सापडणार नाही असा हा कोठे जाईल? हा ग्रीकमधील आपल्या पांगलेल्या यहूदी लोकांस जाऊन त्यांस शिकवील काय?


करिंथमध्ये पौल एका यहूदी मनुष्यास भेटला ज्याचे नाव अक्विला असे होते, तो पंत प्रांतातील रहिवासी होता, आपली पत्नी प्रिस्किल्ला हिच्यासह नुकताच तो इटलीहून आला होता, कारण सर्व यहूदी लोकांनी रोम शहर सोडून गेले पाहिजे असा हुकूम क्लौद्याने काढला होता, पौल त्यांना भेटावयास गेला.


तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो गेला आणि गलतिया व फ्रुगिया या प्रदेशातून ठिकठिकाणी प्रवास करीत गेला, त्याने येशूच्या अनुयायांना विश्वासात बळकट केले.


हे असे दोन वर्षे चालले, याचा परिणाम असा झाला की, आशियात राहत असलेल्या सर्व यहूदी व ग्रीक लोकांपर्यंत प्रभू येशूचे वचन पोहोचले.


तेव्हा सिबिर्तिन नामक लोकांच्या सभास्थानातील काहीजण तसेच कुरेनेकर व आलेक्सांद्रिये नगरातील काही लोक, आणि किलिकिया व आशिया. प्रांतातील काही लोक उठले आणि स्तेफनाबरोबर वादविवाद करू लागले.


विश्वास ठेवणारे सगळीकडे पांगले होते जेथे कोठे विश्वास ठेवणारे जात तेथे ते लोकांस सुवार्ता सांगत.


आशियातील मंडळ्या तुम्हास नमस्कार सांगतात. अक्विला, प्रिस्कील्ला व जी मंडळी त्यांच्या घरात जमते, ती प्रभूमध्ये तुम्हास नमस्कार सांगतात,


बंधूंनो, आमच्यावर आशियात जे संकट आले त्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही इतके, शक्तीपलीकडे, अतिशयच दडपले गेलो की, आम्ही आमच्या जिवंत राहण्याविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती.


त्यावेळी तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे होता, इस्राएलाच्या बाहेरचे होता, वचनाच्या कराराशी तुम्ही अपरिचित असे होता, तुम्ही तुमच्या भविष्याविषयी आशाविरहित आणि देवहीन असे जगात होता.


यामुळे तुम्ही आता परके आणि विदेशी नाही. तर त्याऐवजी तुम्ही पवित्रजनांच्या बरोबरचे सहनागरीक आणि देवाचे कुटुंबीय आहात


परमेश्वर तुम्हास पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व लोकांमध्ये विखरुन टाकील. तेथे तुम्ही काष्ठपाषाणाच्या मूर्तीची उपासना कराल. तुम्हास आणि तुमच्या पूर्वजांना माहीत नसलेल्या परकीय देवांची उपासना कराल.


लोकांच्या आठवणीतून ते पुसले जातील इतका मी या इस्राएलांचा नाश केला असता.


परमेश्वर देव तुम्हास वेगवेगळ्या राष्ट्रात विखरून टाकील. आणि जेथे जेथे तो पाठवील तेथे तुमची संख्या अगदीच अल्प राहील.


आशिया प्रांतामध्ये असणाऱ्या सर्वांनी मला सोडले आहे हे तुला ठाऊकच आहे. त्यामध्ये फुगल व हर्मगनेस आहेत.


हे सगळे विश्वासात टिकून मरण पावले; त्यांना वचनांची प्राप्ती झाली नव्हती. पण त्यांनी ती दुरून बघून त्यांना वंदन केले आणि त्यांनी मानले की, आपण पृथ्वीवर परके आणि प्रवासी आहोत.


याकोब, देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक, याजकडून, जगभर पांगलेल्या, विश्वास ठेवणाऱ्या बारा यहूदी वंशांना नमस्कार.


माझ्या प्रियांनो, तुम्ही उपरी व प्रवासी असल्यामुळे मी तुम्हास विनंती करतो की, आत्म्याबरोबर लढाई करणार्‍या दैहिक वासनांपासून दूर रहा.


आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा, मोलवान विश्वास मिळालेल्या लोकांस, येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याजकडून पत्र;


ती म्हणाली, “तू जो या सर्व गोष्टी पाहतोस त्या तू एका पुस्तकात लिही आणि इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया आणि लावदीकिया या सात शहरातील मंडळ्यांना पाठव.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan