Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 99 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


स्तोत्र 99

1 याहवेह राज्य करतात, राष्ट्रे थरथर कापोत; ते करुबांमध्ये सिंहासनावर आरूढ झाले आहेत; सर्व पृथ्वी कंपित होवो.

2 अतिमहान होत सीयोनातील याहवेह; ते सर्व राष्ट्रात परमोच्च असे आहेत.

3 राष्ट्रे तुमच्या थोर व भयावह नामाची स्तुती करोत— याहवेह पवित्र आहेत.

4 राजा सामर्थ्यशाली आहेत, त्यांना न्याय प्रिय आहे— तुम्ही याकोबात निष्पक्षपात प्रस्थापित केला; जो न्यायसंगत व रास्त आहे.

5 आपले परमेश्वर याहवेहची थोरवी गा, व त्यांच्या चरणी आराधना करा; याहवेह पवित्र आहेत.

6 मोशे आणि अहरोन त्यांचे याजक होते, व शमुवेल त्यांचा उपासक, त्यांचा धावा करणार्‍यांपैकी होते; यांनी याहवेहचा धावा केला, आणि त्यांनी त्यांना उत्तर दिले.

7 ते त्यांच्याशी मेघस्तंभातून बोलले; त्यांच्याकडे सोपविलेल्या अधिनियमांचे व आदेशांचे त्या लोकांनी पालन केले.

8 याहवेह, आमच्या परमेश्वरा, तुम्ही त्यांना उत्तर दिले; त्यांच्या दुष्कृत्यांची त्यांना शिक्षा केली, तरी इस्राएलसाठी तुम्ही क्षमाशील परमेश्वर होता.

9 आपल्या परमेश्वराची थोरवी गा, आणि त्यांच्या पवित्र पर्वतावर उपासना करा, कारण आपले परमेश्वर याहवेह पवित्र आहेत.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan