स्तोत्रसंहिता 93 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 93 1 याहवेह राज्य करतात; ऐश्वर्याची वस्त्रे त्यांनी परिधान केली आहेत; याहवेहनी राजेशाही वस्त्रे परिधान केली आहेत आणि ते शक्तीने सुसज्जित आहेत; निश्चितच, त्यांनी पृथ्वी अत्यंत स्थिर व अढळ केलेली आहे. 2 तुमचे सिंहासन अनादिकालापासून स्थापलेले आहे; तुम्ही अनंतकाळापासून आहात. 3 याहवेह, महासागर उसळत आहेत; महासागरांनी त्यांचा स्वर उंच केलेला आहे; समुद्राच्या प्रचंड लाटांचा प्रहार उग्र होत आहे. 4 सर्व बलाढ्य लाटांहून कितीतरी अधिक शक्तिशाली, तुम्ही महासागरापेक्षाही अधिक बलशाली आहात— सर्वोच्च स्थानातील याहवेह सर्वशक्तिमान आहेत. 5 हे याहवेह, तुमच्या आज्ञा अटळ आहेत; पवित्रता हे तुमच्या भवनाचे अनंतकाळचे आभूषण आहे. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.