Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 85 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


स्तोत्र 85
संगीत निर्देशकाकरिता. कोरहाच्या पुत्रांची रचना. एक स्तोत्र.

1 हे याहवेह, तुमच्या भूमीवर तुम्ही कृपा केली आहे; याकोबाचे ऐश्वर्य तुम्ही त्याला परत दिले आहे.

2 तुम्ही आपल्या लोकांच्या अपराधाची क्षमा केली आणि त्यांच्या पातकावर पांघरूण घातले. सेला

3 म्हणजेच तुमचा सर्व क्रोध शांत झाला आहे, तुमचा भडकलेला संताप आता शमला आहे.

4 हे परमेश्वरा, आमच्या उद्धारकर्त्या, आम्हाला पुनर्स्थापित करा. आमच्याविरुद्ध तुमचा क्रोध पुन्हा भडकू देऊ नका.

5 तुम्ही आमच्यावर सतत कोपलेले राहणार आहात काय? पिढ्यान् पिढ्यांवर तुमचा राग टिकून राहणार आहे काय?

6 तुमचे लोक तुमच्या ठायी हर्षित व्हावे, म्हणून तुम्ही आम्हाला पुनरुज्जीवित करणार नाही काय?

7 हे याहवेह, तुमच्या अक्षयप्रीतीचा आम्हावर वर्षाव करा आणि तुमचे तारण आम्हाला प्रदान करा.

8 परमेश्वर याहवेह जे बोलतील, ते सर्व मी ऐकणार; कारण त्यांनी आपल्या लोकांना व आपल्या भक्तांना शांतीचे अभिवचन दिले आहे. परंतु आपल्या लोकांनी मूर्खपणा करण्याचे थांबवावे.

9 याहवेहचे भय बाळगणारे खरोखरच त्यांच्या तारणाच्या समीप असतात; मग आपला देश त्यांच्या गौरवाने भरून जाईल.

10 प्रीती आणि विश्वसनीयता एकमेकांना भेटले आहेत; नीतिमत्व आणि शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.

11 पृथ्वीतून विश्वसनीयता उदय पावत आहे, आणि स्वर्गातून नीतिमत्व अवलोकन करीत आहे.

12 याहवेह उत्तम गोष्टीं आम्हाला प्रदान करणार आहेत, आणि आमची भूमी मुबलक पीक देणार आहे.

13 नीतिमत्व त्यांच्या पुढे चालेल आणि प्रभूच्या पावलांसाठी मार्ग सिद्ध करेल.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan