Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


स्तोत्र 8
संगीत दिग्दर्शकासाठी. गित्तीथ वर आधारित दावीदाचे स्तोत्र.

1 याहवेह, आमच्या प्रभो, संपूर्ण पृथ्वीवर तुमचे नाव किती वैभवी आहे! स्वर्गदेखील तुमचे गौरव प्रकट करते.

2 लेकरे आणि तान्ह्या बालकांच्या स्तुतीद्वारे तुमचे शत्रू व विरोध्यांना शांत करण्यासाठी शत्रूविरुद्ध बळ स्थापित केले आहे.

3 जेव्हा तुमच्या बोटांची रचना असलेल्या आकाशाकडे बघून मी विचार करतो, चंद्र आणि तारे यथास्थानी स्थापित केलेले पाहतो,

4 मनुष्य तो काय की तुम्ही त्याची आठवण ठेवावी? मानवप्राणी तो काय की तुम्ही त्याची काळजी करावी?

5 तुम्ही त्यांना देवदूतांपेक्षा किंचित कमी असे घडविले आहे. गौरव आणि सन्मान यांचा मुकुट तुम्ही त्यांच्या डोक्यावर ठेवला आहे.

6 तुमच्या प्रत्येक हस्तकृतीवर तुम्ही त्यांना सत्ता दिली आहे; सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या.

7 सर्व कळप व गुरे, आणि वनपशू.

8 आकाशातील पक्षी, आणि समुद्रातील मासे, सागरात संचार करणारे सर्व प्राणी.

9 याहवेह, आमच्या प्रभो, संपूर्ण पृथ्वीवर तुमचे नाव किती वैभवी आहे!

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan