Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 70 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


स्तोत्र 70
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाची रचना. एक याचिका.

1 हे परमेश्वरा, त्वरा करून मला वाचवा; याहवेह, मला साहाय्य करण्यासाठी त्वरेने या.

2 माझा जीव घेऊ पाहणार्‍यांना लज्जित करा व गोंधळात पाडा; जे सर्वजण माझे विघ्नसंतोषी आहेत ते अप्रतिष्ठित होऊन माघारी फिरोत.

3 जे लोक मला, “अहाहा! अहाहा!” म्हणतात, ते लज्जित होऊन माघारी फिरोत.

4 परंतु जे सर्व तुमचा शोध घेतात ते तुमच्यामध्ये आनंद आणि हर्ष करोत; जे तुमच्या तारणाच्या साहाय्याची अपेक्षा बाळगतात ते सर्व नेहमी हेच म्हणोत, “परमेश्वर किती महान आहेत!”

5 परंतु मी तर गरीब आणि गरजवंत आहे; हे परमेश्वरा, माझ्याकडे त्वरेने या. तुम्ही माझे साहाय्यकर्ता आणि मला सोडविणारे आहात; याहवेह, विलंब करू नका.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan