स्तोत्रसंहिता 67 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 67 संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्यांच्या साथीने. एक स्तोत्र. एक गीत. 1 परमेश्वर आमच्यावर कृपा करो आणि आम्हाला आशीर्वाद देवो आणि त्यांचा मुखप्रकाश आम्हावर पडो; सेला 2 यासाठी की पृथ्वीवर तुमचे मार्ग प्रकट व्हावे, तुम्ही सिद्ध केलेले तारण सर्व राष्ट्रांना कळावे. 3 हे परमेश्वरा, राष्ट्रे तुमचे स्तवन करोत, सर्व राष्ट्रे तुमचे स्तवन करोत. 4 राष्ट्रे हर्ष करोत आणि आनंदाने जयघोष करोत, कारण तुम्ही न्यायाने लोकांचा न्यायनिवाडा कराल आणि पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवाल. सेला 5 हे परमेश्वरा, राष्ट्रे तुमचे स्तवन करोत; सर्व राष्ट्रे तुमचे स्तवन करोत. 6 कारण पृथ्वीने विपुल उपज दिला आहे; परमेश्वर, आमचे परमेश्वर, आम्हाला आशीर्वाद देतात. 7 परमेश्वर आम्हाला अजूनही आशीर्वाद देवोत, जेणेकरून पृथ्वीवरील सर्व सीमा त्यांचे भय धरतील. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.