Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 61 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


स्तोत्र 61
संगीत दिग्दर्शकासाठी. तंतुवाद्याच्या साथीने गायचे दावीदाचे स्तोत्र.

1 हे परमेश्वरा, माझा धावा ऐका, माझ्या प्रार्थनेकडे लक्ष द्या.

2 दिगंतापासून मी तुमचा धावा करतो माझे हृदय व्याकूळ झाले असताना; तुम्हीच मला उंच खडकावर न्या.

3 कारण तुम्हीच माझे आश्रयस्थान, शत्रूविरुद्ध उंच बुरूज आहात.

4 तुमच्या मंडपात सदासर्वकाळ राहण्यास आणि तुमच्या पंखांच्या सावलीखाली आश्रय घेण्यास मी उत्कंठित आहे. सेला

5 कारण परमेश्वरा, मी तुम्हाला केलेला नवस तुम्ही ऐकला आहे आणि तुमच्या नावाचे भय धरणार्‍यांचे वतन तुम्ही मला दिले आहेत.

6 तुम्ही राजाचे आयुष्य वाढवा; ते अनेक पिढ्यांमधील पूर्ण भरलेल्या वर्षाप्रमाणे होवो.

7 तो परमेश्वराच्या समोर सदासर्वकाळ राहो. तुमची प्रीती आणि सत्य त्याच्या रक्षणाकरिता प्रकट करा.

8 म्हणजे मी तुमच्या नावाला सतत धन्यवाद देईन आणि दररोज माझी शपथ पूर्ण करेन.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan