स्तोत्रसंहिता 4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 4 संगीत दिग्दर्शकासाठी; तंतुवाद्यावरील दावीदाचे स्तोत्र. 1 हे माझ्या नीतिमान परमेश्वरा, मी तुम्हाला हाक मारेन, तेव्हा मला उत्तर द्या. माझ्या संकटात तुम्हीच मला साहाय्य करा. माझ्यावर दया करा, माझी प्रार्थना ऐका. 2 अहो मनुष्यांनो, किती वेळा तुम्ही माझ्या गौरवाला काळिमा लावणार? किती काळ तुम्ही फसवणुकीवर प्रीती कराल आणि खोट्या दैवतांचा शोध कराल? सेलाह 3 हे लक्षात ठेवा, विश्वासू सेवकांस याहवेहने स्वतःसाठी निवडून बाजूला ठेवले आहे; मी जेव्हा त्यांचा धावा करेन, तेव्हा ते माझे ऐकतील. 4 भीती बाळगा आणि पाप करू नका. बिछान्यावर असता शांत अंतःकरणाने त्यांचे चिंतन करा. सेलाह 5 त्यांना नीतियुक्त यज्ञार्पणे करा. आणि याहवेहवर विश्वास ठेवा. 6 “आमचे कल्याण कोण करणार,” असे अनेकजण म्हणतात, हे याहवेह, तुमच्या चेहर्याचा प्रकाश आम्हावर पाडा. 7 विपुल धान्य व द्राक्षारस देतो त्या आनंदापेक्षाही कितीतरी अधिक आनंद तुम्ही माझ्या हृदयात दिला आहे. 8 मी शांतचित्ताने झोपी जाईन, कारण हे याहवेह तुम्हीच मला सुरक्षित ठेवता. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.