स्तोत्रसंहिता 23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 23 दावीदाचे स्तोत्र. 1 याहवेह माझे मेंढपाळ आहेत, म्हणून मला काही उणे पडणार नाही. 2 ते मला हिरव्यागार कुरणात विश्रांती देतात, ते मला संथपणे वाहणार्या झर्याजवळ नेतात. 3 ते माझा जीव ताजातवाना करतात. ते आपल्या नावासाठी मला नीतिमार्गाने चालवितात. 4 मृत्युछायेच्या दरीतूनही मी जात असलो, तरी कोणत्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तुम्ही माझ्याबरोबर आहात; तुमची आकडी व तुमची काठी मला धीर देतात. 5 तुम्ही माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढता; तुम्ही माझ्या डोक्याला तेलाने अभिषेक करता; माझा प्याला भरभरून वाहत आहे. 6 खरोखर चांगुलपणा व करुणामयप्रीती मजबरोबर आयुष्यभर असतील, आणि मी याहवेहच्या, घरात सदासर्वदा राहीन. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.