Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


स्तोत्र 20
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र.

1 संकटाच्या समयी याहवेह तुझे ऐको; याकोबाच्या परमेश्वराचे नाम सर्व अरिष्टांपासून तुझे रक्षण करो.

2 त्यांच्या पवित्रस्थानातून ते तुला मदत पाठवो आणि ते तुला सीयोनातून साहाय्य पाठवो.

3 तू दिलेल्या सर्व अर्पणांचे त्यांना स्मरण होवो आणि तुझी होमार्पणे ते स्वीकारोत. सेला

4 तुझ्या हृदयातील मनोरथ ते पूर्ण करो आणि तुझ्या सर्व योजना ते सिद्धीस नेवोत.

5 तुझ्या विजयात आम्ही आनंदाने गर्जना करू आणि आपल्या परमेश्वराच्या नावाने आपला झेंडा उंचावू. याहवेह तुझे सर्व मनोरथ पूर्ण करोत.

6 आता मला माहीत आहे: याहवेह आपल्या अभिषिक्तास विजय प्रदान करतात; पवित्र स्वर्गातून त्यांच्या तारणदात्या उजव्या हाताच्या सामर्थ्याने त्याला उत्तर देतात.

7 कोणी रथांवर आणि कोणी घोड्यांवर भरवसा ठेवतात, परंतु आम्ही याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावावर भरवसा ठेऊ.

8 ती कोसळतील आणि नाश पावतील, पण आम्ही उठू आणि बळकटपणे उभे राहू.

9 याहवेह, राजाला विजयी करा! जेव्हा आम्ही हाक मारू, तेव्हा आमचे ऐका!

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan