Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


स्तोत्र 16
दावीदाचे मिक्ताम

1 परमेश्वरा, माझे रक्षण करा, कारण मी तुमच्या आश्रयाला आलो आहे.

2 मी याहवेहला म्हणालो, “तुम्हीच माझे प्रभू आहात; तुमच्याशिवाय दुसरे चांगले असे काहीच माझ्याकडे नाही.”

3 पृथ्वीवरील लोक जे पवित्र आहेत, “ते आदरणीय आहेत, त्यांच्याठायी मी प्रसन्न आहे.”

4 जे अन्य दैवतांच्या भजनी लागतात, ते अनेक दुःखांनी ग्रासले जातील. अशा दैवतांना मी रक्तमय पेयार्पणे अर्पिणार नाही किंवा त्यांची नावेही मी माझ्या ओठांनी उच्चारणार नाही.

5 याहवेह तुम्हीच माझे वतन, माझा प्याला आहात; तुम्हीच माझा वाटा सुरक्षित करता.

6 माझ्या वाट्याला सीमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत; माझ्यासाठी खरोखरच एक सुंदर वारसा आहे.

7 मी याहवेहची स्तुती करणार, ज्यांनी माझे मार्गदर्शन केले आहे; रात्रीच्या समयी माझे अंतःकरण मला बोध करते.

8 मी आपली दृष्टी सतत याहवेहवर ठेवली आहे; ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही.

9 यास्तव माझे अंतःकरण उल्हासित आहे आणि माझी जीभ स्तुतिगान करीत आहे; माझे शरीर देखील सुरक्षिततेत विसावा घेईल.

10 कारण तुम्ही मला अधोलोकात राहू देणार नाही; किंवा तुमच्या विश्वासणार्‍याला तुम्ही कुजणे पाहू देणार नाही.

11 तुम्ही मला जीवनाचा मार्ग दाखवाल; तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल, तुमच्या उजव्या हातात सर्वदा सौख्य आहे.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan