स्तोत्रसंहिता 149 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 149 1 याहवेहचे स्तवन करा. याहवेहसाठी एक नवे गीत गा, त्यांच्या भक्तांच्या सभेत त्यांची स्तुतिस्तोत्रे गायली जावोत. 2 हे इस्राएला, आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव कर; अहो सीयोनकरांनो, आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावा. 3 त्यांच्या गौरवार्थ नृत्य करीत, डफ आणि वीणा यांच्या संगीताच्या साथीवर स्तुती गा. 4 कारण याहवेहला आपल्या लोकांमुळे संतोष होतो; ते नम्रजनांस विजयी करतात. 5 या सन्मानामुळे त्यांचे सात्विक उल्लास करोत आणि आपल्या अंथरुणावर हर्षगीते गावोत. 6 त्यांच्या मुखात परमेश्वराची आराधना असो आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात धारण करून, 7 राष्ट्रांसाठी त्यांनी नेमलेल्या शिक्षा अंमलात आणण्यास सिद्ध व्हावे; 8 त्या राष्ट्रांच्या राजांना बेड्या घाला आणि त्यांच्या पुढार्यांना लोखंडी साखळदंडानी बांधा. 9 त्यांना दिलेल्या शिक्षांची अंमलबजावणी करा. हाच याहवेहच्या विश्वासू लोकांचा गौरव आहे. याहवेहचे स्तवन करा. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.