Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 146 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


स्तोत्र 146

1 याहवेहचे स्तवन करा. हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर.

2 आजीवन मी याहवेहचे स्तवन करेन; माझ्या जिवात जीव असेपर्यंत मी माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.

3 तुम्ही अधिपतींवर भरवसा ठेवू नका; ते केवळ मानव आहेत; तारण करण्याचे सामर्थ्य त्यांच्याजवळ नाही.

4 कारण जेव्हा त्यांचे प्राण जातात, त्यांचे शरीर भूमीत परत जाऊन मिळते; त्या दिवशी त्यांनी केलेल्या सर्व योजना नष्ट होतात.

5 तो मनुष्य धन्य होय, ज्याचा साहाय्यकर्ता याकोबाचा परमेश्वर आहे, आणि ज्याची आशा याहवेह त्याच्या परमेश्वराच्या ठायी आहे,

6 कारण त्यांनीच आकाश, पृथ्वी, सागर, आणि त्यातील सर्वकाही निर्माण केले; ते सदासर्वदा विश्वासयोग्य आहेत.

7 गरीब व गांजलेले यांना तेच योग्य न्याय देतात; तसेच भुकेल्यांस ते अन्न देतात; याहवेहच बंदिवानांना मुक्त करतात,

8 ते आंधळ्यास दृष्टी प्रदान करतात, याहवेह ओझ्याखाली वाकलेल्यास उचलून उभे करतात, परमेश्वराला नीतिमान प्रिय आहेत.

9 याहवेह निर्वासितांचे रक्षण करतात, आणि अनाथ व विधवा यांची काळजी घेतात, परंतु दुष्टांच्या योजना ते नष्ट करतात.

10 याहवेह सर्वकाळ राज्य करतील, हे सीयोना, तुझे परमेश्वर पिढ्यान् पिढ्या राज्य करतील. याहवेहचे स्तवन करा.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan