Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 138 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


स्तोत्र 138
दावीदाचे स्तोत्र.

1 हे याहवेह, मी माझ्या अंतःकरणापासून तुमचे उपकारस्मरण करेन; मी तुमची स्तुतिस्तोत्रे “दैवतांच्या” पुढे गाईन.

2 उपासना करीत असताना, तुमच्या मंदिराकडे मी नतमस्तक होईन, आणि तुमच्या सर्व दयामय प्रीतीबद्दल आणि विश्वासूपणाबद्दल, तुमची उपकारस्तुती करेन, कारण तुम्ही तुमच्या वचनाला तुमच्या किर्तीपेक्षा उंच केले आहे.

3 जेव्हा मी हाक मारली, तुम्ही प्रत्युत्तर दिले; मला शक्ती देऊन खूप धैर्य दिले.

4 हे याहवेह, पृथ्वीवरील सर्व राजे तुमचे उपकारस्मरण करतील, कारण यातील प्रत्येकजण तुमच्या मुखाचे निर्णय ऐकतील.

5 ते याहवेहच्या गौरवशाली मार्गाचे गुणगान करतील, कारण याहवेहचे गौरव अतिथोर आहे.

6 याहवेह महान असले तरी ते दीनांची दयेने काळजी घेतात; गर्विष्ठ लोकांना मात्र ते दुरूनच ओळखतात.

7 मी संकटांनी वेढलेला असलो, तरी तुम्ही मला त्यातून सुखरुपपणे सोडविता; माझ्या संतापलेल्या शत्रूंवर तुम्ही आपला हात उगारता; तुमचा उजवा हात माझा बचाव करतो.

8 याहवेह माझे निर्दोषत्व सिद्ध करतील; परमेश्वरा, तुमची करुणा सनातन आहे— आपल्या हस्तकृतीचा त्याग करू नका.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan