Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 137 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


स्तोत्र 137

1 आम्ही बाबेलच्या नदीकाठावर बसलो आणि सीयोनाची आठवण करीत रडलो.

2 आम्ही आमच्या वीणा वाळुंजाच्या फांद्यावर टांगल्या,

3 कारण आम्हाला कैद करणाऱ्यांनी आम्हाला गात गाण्यास सांगितले, आमचा छळ करणार्‍यांनी आनंद गीते गाण्याची मागणी केली, ते म्हणाले, “आमच्या करमणुकी करिता सीयोनाचे एखादे गीत गाऊन दाखवा!”

4 या परदेशात आमच्या याहवेहचे स्तवनगीत गाणे आम्हाला कसे शक्य आहे?

5 हे यरुशलेम, मी तुला विसरलो, तर माझा उजवा हात त्याचे कौशल्य विसरो;

6 जर मी यरुशलेमला माझा सर्वोच्च आनंद मानत नसेन, तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.

7 हे याहवेह, माझ्या देवा, यरुशलेमचा पाडाव झाला त्या दिवशी एदोमाच्या वंशजांनी काय केले याचे स्मरण करा. ते आरोळ्या मारत होते, “तिला जमीनदोस्त करा, तिचा पाया देखील ढासळून टाका.”

8 अगे बाबेलच्या कन्ये, तुझा नाश निश्चित आहे; तू जसा आमचा नाश केलास, तसा तुझी परतफेड करणारा धन्य होईल.

9 जो तुझी तान्ही बालके घेऊन, त्यांना खडकावर आपटेल, तो धन्य!

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan