स्तोत्रसंहिता 129 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 129 प्रवाशांचे आराधना गीत. 1 “माझ्या किशोरावस्थेपासून त्यांनी माझ्यावर घोर अत्याचार केला आहे,” इस्राएल म्हणो; 2 “माझ्या किशोरावस्थेपासून माझ्यावर घोर अत्याचार करण्यात आला आहे, तरीही त्यांना माझ्यावर विजय मिळविता आला नाही. 3 शेतकर्याने नांगरल्याप्रमाणे त्यांनी माझ्या पाठीवर लांब लांब तासे काढली. 4 परंतु याहवेह न्यायी आहेत; त्यांनी मला त्या दुष्टांच्या बंधनातून मुक्त केले.” 5 सीयोनाचा द्वेष करणारे सर्व लाजिरवाणा पराजय होऊन परत जावोत. 6 घरांच्या छपरावर उगविलेल्या गवतासारखे ते होवोत, जे अर्धवट वाढल्याबरोबर सुकून पिवळे पडते; 7 कापणार्यांच्या हातात काहीही पडत नाही, की बांधणार्यांनाही पेंढ्या मिळत नाहीत. 8 येणारे जाणारे लोक त्यांना असे न म्हणोत, “याहवेहचे आशीर्वाद तुम्हावर येवोत; आम्ही तुम्हाला याहवेहच्या नावाने आशीर्वाद देतो.” |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.