स्तोत्रसंहिता 127 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 127 प्रवाशांचे एक आराधना गीत. शलोमोनाची रचना. 1 याहवेहने घर बांधले नाही, तर बांधकाम करणार्यांचे श्रम व्यर्थ आहेत; याहवेहने शहराचे रक्षण केले नाही, तर पहारेकर्यांचे जागणे व्यर्थ आहे. 2 तुमचे पहाटे उठणे आणि रात्री उशीरापर्यंत अन्नप्राप्तीसाठी कष्ट करणे व्यर्थ आहे— कारण आपल्या प्रियजनांस याहवेहच शांत झोप देतात. 3 मुले, ही याहवेहकडून मिळालेला वारसा आहे, प्रसवशील कूस, हे याहवेहकडून लाभणारे प्रतिफळ आहे. 4 तरुणपणी झालेली मुले, शूरवीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत. 5 ज्या पुरुषाचा भाता अशा बाणांनी भरलेला आहे, तो धन्य! असे पुरुष वेशीत आपल्या शत्रूशी न्यायालयात वाटाघाटी करतील, तेव्हा ते लज्जित होणार नाहीत. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.