स्तोत्रसंहिता 125 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 125 प्रवाशांचे आराधना गीत. 1 ज्यांचा याहवेहवर विश्वास आहे, ते सीयोन पर्वतासारखे स्थिर आहेत, कारण ते कधीही ढळत नाहीत, तर सर्वकाळ टिकतात. 2 यरुशलेमला वेष्टण करणारे पर्वत जसे तिचे रक्षण करतात, तसेच आता आणि सदासर्वकाळ, याहवेह आपल्या लोकांना वेष्टून त्यांचे रक्षण करतात. 3 नीतिमान लोकांना दिलेल्या वतनावर दुष्टांचा राजदंड टिकून राहणार नाही, नाहीतर नीतिमान लोकही त्यांच्या हाताने दुष्टता करतील. 4 हे याहवेह, जे नीतिमान आहेत, ज्यांचे हृदय निष्ठावंत आहे, त्यांचे तुम्ही कल्याण करा. 5 परंतु जे आपल्या कुटिल मार्गांकडे वळतात, त्यास याहवेह दुष्कर्म्यांबरोबर घालवून देतील. इस्राएलावर शांती असो. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.