Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 124 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


स्तोत्र 124
प्रवाशांचे आराधना गीत. दावीदाची रचना.

1 सर्व इस्राएलने हे कबूल करावे की— जर याहवेह आमच्या बाजूने नसते,

2 जेव्हा मनुष्यांनी आमच्यावर आक्रमण केले होते, जर याहवेह आमच्या बाजूने नसते,

3 तर त्यांचा संताप आमच्यावर भडकला असता. तेव्हा त्या शत्रूंनी आम्हाला जिवंत गिळून टाकले असते;

4 जलप्रलयात आम्ही बुडून गेलो असतो व जलप्रवाहात आम्ही पार वाहून गेलो असतो,

5 उचंबळलेल्या लाटांनी आम्हाला गिळंकृत केले असते.

6 याहवेह धन्यवादित असोत; त्यांनी आम्हाला शत्रूंचे भक्ष्य होऊ दिले नाही.

7 पारध्याच्या पाशातून पक्षी निसटावा, त्याप्रमाणे आम्ही जिवानिशी निसटलो; पाश तुटलेला आहे आणि आम्ही मुक्त झालो आहोत.

8 आमच्या साहाय्याचा उगम, स्वर्ग व पृथ्वीचे निर्माणकर्ते परमेश्वर, याहवेह यांचे नाव आहे.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan