Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

स्तोत्रसंहिता 120 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


स्तोत्र 120
प्रवाशांचे आराधना गीत.

1 संकटसमयी मी याहवेहकडे आरोळी मारली, आणि त्यांनी ती ऐकली.

2 हे याहवेह, असत्य बोलणार्‍या ओठांपासून व कपटी जिव्हेपासून माझा बचाव करा.

3 अगे कपटी जिभे, ते तुला काय करतील, आणखी तुला कशी वागणूक मिळेल?

4 ते तुला योद्ध्यांच्या तीक्ष्ण बाणांनी, केरसुणीच्या लाकडांच्या निखार्‍यांनी दंड करतील.

5 धिक्कार असो माझा, जर मी मेशेख हे माझे निवासस्थान केले, वा केदार येथे माझा डेरा घातला!

6 जे शांतिप्रिय नाहीत अशा लोकांसह राहण्यात मी बराच काळ घालविला आहे.

7 मी तर शांतताप्रिय आहे; पण मी काही बोलताच ते युद्धास तयार होतात.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan