स्तोत्रसंहिता 114 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीस्तोत्र 114 1 जेव्हा इस्राएल इजिप्तमधून, परकीय भाषेच्या लोकातून याकोब बाहेर पडला, 2 यहूदाह परमेश्वराचे पवित्रस्थान, आणि इस्राएल त्यांचे सार्वभौमत्व झाले. 3 तांबड्या समुद्राने हे पाहून पळ काढला, आणि यार्देन नदी माघारी गेली; 4 पर्वतांनी मेंढ्यांप्रमाणे आणि टेकड्यांनी कोकरांसारख्या उड्या मारल्या. 5 हे समुद्रा, तू पलायन का केले? अगे यार्देने, तू मागे का फिरलीस? 6 पर्वतांनो, तुम्ही मेंढ्यांप्रमाणे, टेकड्यांनो, तुम्ही कोकरांसारखे का बागडलात? 7 अगे पृथ्वी, तू परमेश्वराच्या समक्षतेत, याकोबाच्या देवासमोर, थरथर काप. 8 कारण त्यांनीच खडकाचे झर्यात रूपांतर केले, अत्यंत कणखर खडकास जलाचे स्त्रोत बनविले. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.