गणना 26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीदुसरी जनगणना 1 पीडेनंतर याहवेहने मोशे व अहरोन याजकाचा पुत्र एलअज़ारला म्हटले, 2 “इस्राएली लोकांच्या संपूर्ण समाजाची त्यांच्या घराण्यानुसार—जे सर्व वीस किंवा अधिक वयाचे असून इस्राएलच्या सैन्यात सेवा करण्यास सक्षम आहेत, त्यांची जनगणना कर.” 3 म्हणून मोशे व एलअज़ार याजक मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीच्या काठावर इस्राएली लोकांशी बोलले आणि म्हणाले, 4 “याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे जे पुरुष वीस किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांची मोजणी करा.” इजिप्तमधून जे इस्राएली लोक बाहेर आले ते हे: 5 रऊबेन, इस्राएलच्या प्रथम जन्मलेल्या पुत्राचे वंशज हे: हनोखपासून हनोखी कूळ; पल्लूपासून पल्लूवी कूळ; 6 हेस्रोनपासून हेस्रोनी कूळ; कर्मीपासून कर्मी कूळ. 7 ही रऊबेनची कुळे होती; मोजलेल्यांची संख्या 43,730 भरली. 8 पल्लूचा पुत्र एलियाब होता, 9 आणि एलियाबाचे पुत्र नेमूएल, दाथान आणि अबीराम होते. तेच दाथान आणि अबीराम जे समाजाचे अधिकारी होते, ज्यांनी मोशे आणि अहरोन विरुद्ध बंड केले आणि जेव्हा त्यांनी याहवेहविरुद्ध बंड केले तेव्हा ते कोरहाच्या अनुयायांपैकी होते. 10 ज्यावेळी पृथ्वीने आपले तोंड उघडले आणि कोरह व त्याच्या अनुयायांना गिळून टाकले व त्यांच्यातील दोनशे पन्नास पुरुषांना अग्नीने भस्म करून टाकले. ते लोकांसाठी एक चेतावणीचे चिन्ह होते. 11 तरीही कोरहाचे सर्वच वंशज मेले नाही. 12 शिमओनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: नेमूएलपासून नेमूएली कूळ; यामीनपासून यामीनी कूळ; याकीनपासून याखीनी कूळ; 13 जेरहपासून जेरही कूळ; शाऊलपासून शाऊली कूळ. 14 ही शिमओनी कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 22,200 भरली. 15 गादचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: जेफोनपासून जेफोनी कूळ; हग्गीपासून हग्गी कूळ; शूनीपासून शूनी कूळ; 16 ओजनीपासून ओजनी कूळ; एरीपासून एरी कूळ; 17 अरोदपासून अरोदी कूळ; अरेलीपासून अरेली कूळ. 18 ही गादची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 40,500 भरली. 19 एर आणि ओनान हे यहूदाहचे पुत्र होते, परंतु ते कनान देशात मरण पावले. 20 यहूदाहचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शेलाहपासून शेलानी कूळ; पेरेसापासून पेरेसी कूळ; जेरहपासून जेरही कूळ. 21 पेरेसचे वंशज हे होते: हेस्रोनपासून हेस्रोनी कूळ; हामूलपासून हामूली कूळ. 22 ही यहूदाहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 76,500 भरली. 23 इस्साखारचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: तोलापासून तोलाई कूळ; पुवाहपासून पुनी कूळ; 24 याशूबपासून याशूबी कूळ; शिम्रोनपासून शिम्रोनी कूळ. 25 ही इस्साखारची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 64,300 भरली. 26 जबुलूनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: सेरेदपासून सेरेदी कूळ; एलोनपासून एलोनी कूळ; याहलीलपासून याहलेली कूळ. 27 ही जबुलूनची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 60,500 भरली. 28 योसेफाचे कूळ त्याचे वंशज मनश्शेह व एफ्राईमचे कूळ हे होते: 29 मनश्शेहचे वंशज: माखीरपासून माखीरी कूळ (माखीर गिलआदाचा पिता होता); गिलआदापासून गिलआदी कूळ. 30 हे गिलआदाचे वंशज होते: इएजेरपासून इएजेरी कूळ; हेलेकपासून हेलेकी कूळ; 31 अस्रिएलपासून अस्रिएली कूळ; शेखेमपासून शेखेमी कूळ; 32 शेमीदापासून शेमीदाई कूळ; हेफेरपासून हेफेरी कूळ. 33 (हेफेरचा पुत्र सलाफहादला पुत्र नव्हते; त्याला फक्त कन्या होत्या, त्यांची नावे महलाह, नोआह, होगलाह, मिल्काह आणि तिरजाह होती.) 34 ही मनश्शेहची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 52,700 भरली. 35 एफ्राईमचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शुथेलहपासून शूथेलाही कूळ; बेकेरपासून बेकेरी कूळ; तहनपासून तहनी कूळ. 36 शुथेलहाचे वंशज हे होते: एरानपासून एरानी कूळ. 37 हे एफ्राईमचे कूळ होते; जे मोजले त्यांची संख्या 32,500 भरली. हे त्यांच्या कुळानुसार योसेफाचे वंशज होते. 38 बिन्यामीनचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: बेलापासून बेलाई कूळ; आशबेलपासून अशबेली कूळ; अहीरामपासून अहीरामी कूळ; 39 शफूफामपासून शूफामी कूळ; हूफामपासून हूफामी कूळ. 40 आर्द आणि नामान यांच्याद्वारे बेलाचे वंशज हे होते: आर्दाचे आर्दी कूळ; नामान द्वारे नामीनी कूळ. 41 ही बिन्यामीनची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 45,600 भरली. 42 दानचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शूहामपासून शूहामी कूळ. ही दानची कुळे होती: 43 ती सर्व शूहामी कुळे होती; आणि जे मोजले त्यांची संख्या 64,400 भरली. 44 आशेरचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: इम्नाहपासून इम्नी कूळ; इश्वीपासून इश्वी कूळ; बरीयाहपासून बरीयाह कूळ; 45 आणि बरीयाहच्या वंशजांपासून: हेबेरपासून हेबेरी कूळ; मालकीएलपासून मालकीएली कूळ. 46 आशेरला सेराह नावाची कन्या होती. 47 ही आशेरची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 53,400 भरली. 48 नफतालीचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: याहसेलपासून याहसेली कूळ; गूनीपासून गूनी कूळ; 49 येसेरपासून येसेरी कूळ; शिल्लेमपासून शिल्लेमी कूळ. 50 ही नफतालीची कुळे होती; जे मोजले त्यांची संख्या 45,400 भरली. 51 इस्राएली लोकांची एकूण संख्या 6,01,730 भरली. 52 याहवेहने मोशेला म्हटले, 53 “त्यांना नावाच्या संख्येनुसार देश वतन म्हणून द्यावा. 54 मोठ्या गटाला मोठा वारसा द्यावा आणि लहान गटाला लहान वारसा द्या; ज्यांची नावे यादीत आहेत त्यानुसार प्रत्येकाला संख्येनुसार त्यांचा वारसा मिळावा. 55 जमिनीची वाटणी चिठ्ठ्या टाकून होईल याची खात्री करावी. त्यांच्या पूर्वजांच्या गोत्राच्या नावानुसार प्रत्येक गटाला वारसा मिळावा. 56 प्रत्येक वारसा मोठ्या आणि लहान गटांमध्ये चिठ्ठ्याद्वारे वाटप केला जावा.” 57 ज्या लेवी लोकांची त्यांच्या कुळानुसार मोजणी झाली ते हे: गेर्षोनापासून गेर्षोनी कूळ; कोहाथापासून कोहाथी कूळ; मरारीपासून मरारी कूळ. 58 ही देखील लेवी लोकांची कुळे होती: लिब्नी कूळ, हेब्रोनी कूळ, महली कूळ, मूशी कूळ, कोरही कूळ. कोहाथ हा अम्रामाचा पूर्वज होता; 59 अम्रामाच्या पत्नीचे नाव योखबेद होते, ती लेवी वंशातील होती, जी लेवीच्या घराण्यात इजिप्तमध्ये असताना जन्मली होती. अम्रामापासून तिने अहरोन, मोशे व त्यांची बहीण मिर्यामला जन्म दिला. 60 अहरोन नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार यांचा पिता होता. 61 परंतु नादाब आणि अबीहूने याहवेहसमोर अनाधिकृत अग्नीद्वारे अर्पण केल्यामुळे ते मरण पावले. 62 एक महिन्यापेक्षा अधिक वयाच्या लेवी पुरुषांची संख्या 23,000 भरली. इस्राएलच्या इतर लोकांमध्ये त्यांची मोजणी झाली नाही, कारण त्यांना त्यांच्यामध्ये वाटा मिळाला नाही. 63 मोआबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी मोशे व एलअज़ार याजकाने वरील इस्राएली लोकांची मोजणी केली. 64 सीनाय रानात मोशे आणि अहरोन याजकाने इस्राएली लोकांची जी मोजणी केली होती, त्यांच्यापैकी एकही या गणतीत नव्हता. 65 कारण याहवेहने त्या इस्राएली लोकांना सांगितले होते की ते खचितच रानात मरतील आणि यफुन्नेहचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशुआ यांच्याशिवाय एकही उरले नाही. |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.