Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

गणना 2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


गोत्राच्या डेर्‍यांची व्यवस्था

1 याहवेहने मोशे आणि अहरोनाला म्हटले:

2 “इस्राएली लोकांनी सभामंडपाच्या सभोवती, त्यापासून थोडे अंतरावर आपआपले डेरे उभारावे, प्रत्येकाने ते आपआपल्या झेंड्याजवळ व आपल्या घराण्याच्या निशाणाजवळ ते उभारावे.”

3 पूर्वेकडे, सूर्योदयाच्या दिशेने: यहूदाहच्या छावणीच्या दलांनी त्यांच्या झेंड्याखाली आपला डेरा द्यावा. यहूदाहच्या लोकांचा पुढारी अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन असावा.

4 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 74,600 होती.

5 इस्साखारचे गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देणार. इस्साखारच्या लोकांचा पुढारी सूवाराचा मुलगा नथानेल असावा.

6 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 54,400 होती.

7 त्यानंतर जबुलूनचे गोत्र असणार. हेलोनचा पुत्र एलियाब हा जबुलूनच्या लोकांचा पुढारी आहे.

8 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 57,400 होती.

9 यहूदाहच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार, संख्येने 1,86,400 होते. त्यांनी सर्वप्रथम निघावे.

10 दक्षिणेच्या बाजूस: रऊबेनच्या छावणीच्या दलाने त्यांच्या झेंड्याखाली आपला डेरा द्यावा असावा. रऊबेनच्या लोकांचा पुढारी शेदेऊरचा पुत्र एलीसूर आहे.

11 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 46,500 होती.

12 शिमओनचे गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देईल. शिमओनच्या लोकांचा पुढारी सुरीशादैचा पुत्र शेलुमीएल आहे.

13 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 59,300 होती.

14 त्यानंतर गाद गोत्र असेल. गादच्या लोकांचा पुढारी रऊएलाचा पुत्र एलीआसाफ आहे.

15 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 45,650 होती.

16 रऊबेनच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,51,450 होते. ते दुसर्‍या रांगेत निघतील.

17 मग सभामंडप व लेव्यांची छावणी सर्व छावण्यांच्या मध्यभागी असणार. ज्या क्रमाने ते डेरा देऊन राहतात त्याच क्रमाने, आपल्या झेंड्याखाली आपआपल्या जागेवर त्यांनी निघावे.

18 पश्चिमेच्या बाजूस: एफ्राईमच्या दलाने आपल्या झेंड्याखाली आपला डेरा द्यावा. एफ्राईमच्या लोकांचा पुढारी अम्मीहूदाचा पुत्र एलीशामा आहे.

19 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 40,500 होती.

20 मनश्शेहचे गोत्र त्यांच्यानंतर असेल. मनश्शेहच्या लोकांचा पुढारी पदहसूरचा पुत्र गमलीएल आहे.

21 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 32,200 होती.

22 त्यानंतर बिन्यामीनचे गोत्र असणार. बिन्यामीन लोकांचा पुढारी गिदयोनीचा पुत्र अबीदान आहे.

23 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 35,400 होती.

24 एफ्राईमच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,08,100 होते. ते तिसर्‍या रांगेत निघतील.

25 उत्तरेच्या बाजूस: दानच्या दलाने आपल्या झेंड्याखाली त्यांचा डेरा द्यावा. दान लोकांचा पुढारी अम्मीशद्दायचा पुत्र अहीएजर आहे.

26 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 62,700 होती.

27 आशेर गोत्र त्यांच्या शेजारी डेरा देईल. आशेर लोकांचा पुढारी ओक्रानचा पुत्र पगीयेल आहे.

28 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 41,500 होती.

29 नफताली गोत्र त्यांच्या शेजारी असणार. नफताली लोकांचा पुढारी एनानाचा पुत्र अहीरा आहे.

30 त्यांच्या दलातील लोकांची संख्या 53,400 होती.

31 दानच्या छावणीत नेमलेले सर्व पुरुष, त्यांच्या दलानुसार संख्येने 1,57,600 होते. त्यांच्या झेंड्याखाली ते सर्वांच्या शेवटी निघतील.

32 आपआपल्या घराण्यानुसार मोजलेले इस्राएली लोक हे आहेत. छावणीतील सर्व पुरुषांची संख्या 6,03,550 होती.

33 याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इतर इस्राएल लोकांबरोबर लेव्यांची मोजणी केली नव्हती.

34 अशा रीतीने याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे इस्राएली लोकांनी प्रत्येक गोष्ट केली, ते असे की, आपआपल्या झेंड्याजवळ ते डेरे देत असत आणि आपले कूळ व घराणे यानुसार पुढे चालत असत.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan