Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहोशवा 16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


एफ्राईम व मनश्शेह यांना मिळालेले वतन

1 योसेफाच्या गोत्राला मिळालेल्या भागाची सुरुवात यार्देनेकडून होते, यरीहोच्या पूर्वेकडील झर्‍यापासून रानातून बेथेलच्या डोंगराळ प्रदेशापर्यंत जाते.

2 पुढे ती बेथेल (म्हणजे लूज) पासून अर्की लोकांची सीमा पार करून अटारोथपर्यंत गेली,

3 पुढे ती पश्चिमेकडे यफलेटीच्या सीमेवरून खालच्या बेथ-होरोन व पुढे गेजेरपर्यंत उतरून भूमध्य समुद्रापर्यंत संपते.

4 याप्रमाणे योसेफाचे वंशज मनश्शेह आणि एफ्राईम यांना वतन मिळाले.

5 एफ्राईमच्या गोत्राची त्यांच्या कुळानुसार ही सीमा होती: त्यांच्या वतनाची सीमा पूर्वेतील अटारोथ-अद्दार येथून बेथ-होरोनचा वरील भाग

6 आणि पुढे भूमध्य समुद्रापर्यंत गेलेली होती. उत्तरेकडील मिकमथाथवरून वळून पुढे तानथ-शिलोहवरून पूर्वेकडे यानोहा येथवर गेलेली होती.

7 नंतर पुढे ती सीमा यानोहापासून खाली वळून अटारोथ व नाराह येथवर जाऊन यरीहोस पोहोचून यार्देनातून आली होती.

8 तप्पूआहपासून ही सीमा पश्चिम दिशेस कानाहा ओहोळावरून जाऊन भूमध्य समुद्रापर्यंत संपते. एफ्राईम गोत्रास त्यांच्या कुळानुसार मिळालेले वतन हे होते.

9 मनश्शेहच्या वतनातील काही नगरे आणि त्यांची गावे सुद्धा एफ्राईमचे वतन म्हणून वेगळी करून ठेवण्यात आली होती.

10 त्यांनी गेजेरात राहणार्‍या कनानी लोकांना घालवून दिले नाही; आजपर्यंत कनानी लोक एफ्राईम लोकांमध्ये राहत आहेत. परंतु लादून दिलेली मजुरीची कामे त्यांना करावी लागतात.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan