Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -

यहोशवा 12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती


पराभूत झालेल्या राजांची यादी

1 यार्देन नदीच्या पूर्वेकडे आर्णोन खोर्‍यापासून हर्मोन पर्वतापर्यंत व पूर्वेकडील सर्व अराबासह ज्या राजांना इस्राएली लोकांनी पराभूत करून ज्यांच्या सीमा हस्तगत केल्या ते हे:

2 हेशबोन येथे राज्य करणारा अमोर्‍यांचा राजा सीहोन. त्याच्या राज्याचा विस्तार आर्णोन खोर्‍याच्या कडेवरील अरोएर शहरापासून आणि आर्णोन खोर्‍याच्या मध्यभागापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत होता. यामध्ये अर्ध्या गिलआदाचा समावेश होता.

3 अराबाच्या पूर्वेकडील भागावर सुद्धा त्याने राज्य केले, तसेच किन्नेरेथ समुद्रापासून अराबाचा समुद्र (म्हणजे मृत समुद्र), बेथ-यशिमोथपर्यंत आणि दक्षिणेकडे पिसगा पर्वताच्या उतरणीपर्यंत राज्य केले.

4 बाशानचा राजा ओग, जो रेफाईम लोकांपैकी शेवटचा होता, त्याने अष्टारोथ व एद्रेई येथे राज्य केले.

5 त्याचे राज्य हर्मोन पर्वत, सलेकाह, संपूर्ण बाशानपासून गशूरी आणि माकाथी लोकांच्या सीमेपर्यंत, अर्ध्या गिलआद पासून हेशबोनचा राजा सीहोन याच्या सीमेपर्यंत विस्तृत होते.

6 याहवेहचा सेवक मोशे व इस्राएलच्या लोकांनी या लोकांवर विजय मिळविला आणि याहवेहचा सेवक मोशेने त्यांचा देश रऊबेन, गाद व मनश्शेहच्या अर्ध्या गोत्रांना त्यांचे वतन म्हणून दिला होता.

7 यार्देनेच्या पश्चिमेस असलेल्या लबानोन खोर्‍यातील बआल-गादपासून व सेईरास जाणार्‍या हालाक डोंगरापर्यंतच्या ज्या देशांच्या राजांवर यहोशुआ व इस्राएली लोकांनी विजय मिळविला ते हे आहेत. यहोशुआने त्यांचे प्रदेश इस्राएलांच्या गोत्रांना त्या गोत्रांच्या वाट्याप्रमाणे वतन म्हणून दिला.

8 यात डोंगराळ प्रदेश, पश्चिमेकडील तळवट, अराबा, डोंगराचा उतार, अरण्याचा भाग आणि नेगेव प्रांतांचा समावेश होता. हे सर्व प्रदेश हिथी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसीचे होते. त्या प्रदेशांचे राजे हे होते:

9 यरीहोचा राजा-एक, बेथेल जवळील आय शहराचा राजा-एक,

10 यरुशलेमचा राजा-एक, हेब्रोनचा राजा-एक,

11 यर्मूथचा राजा-एक, लाखीशचा राजा-एक,

12 एग्लोनाचा राजा-एक, गेजेरचा राजा-एक,

13 दबीरचा राजा-एक, बेथ-गादेरचा राजा-एक,

14 होरमाहचा राजा-एक, अरादचा राजा-एक,

15 लिब्नाहचा राजा-एक, अदुल्लामचा राजा-एक,

16 मक्केदाचा राजा-एक, बेथेलचा राजा-एक,

17 तप्पूआहचा राजा-एक, हेफेराचा राजा-एक,

18 अफेकाचा राजा-एक, शारोनचा राजा-एक,

19 मादोनाचा राजा-एक, हासोरचा राजा-एक,

20 शिम्रोन-मरोनाचा राजा-एक, अक्षाफाचा राजा-एक,

21 तानखाचा राजा-एक, मगिद्दोचा राजा-एक,

22 केदेशचा राजा-एक, कर्मेलातील योकनामाचा राजा-एक,

23 नाफथ दोरचा राजा-एक, गिलगालातील गोईमाचा राजा-एक,

24 तिरजाहचा राजा-एक, ते सर्व एकूण एकतीस राजे होते.

पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™

ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.

यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.

सर्व अधिकार जगभरात राखीव.

Holy Bible, Marathi Contemporary Version™

Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.

Used with permission.

All rights reserved worldwide.

Biblica, Inc.
Lean sinn:



Sanasan