इय्योब 25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीबिल्दद 1 मग बिल्दद शूहीने उत्तर देत म्हटले: 2 “प्रभुत्व आणि भय हे परमेश्वराचे आहे; तेच परमोच्च स्वर्गामध्ये शांती स्थापित करतात. 3 त्यांच्या सैन्याची गणती करता येईल काय? आणि त्यांचा प्रकाश कोणावर पडत नाही? 4 मग मर्त्य परमेश्वरासमोर कसा नीतिमान ठरेल? स्त्रीपासून जन्मलेला व्यक्ती पवित्र असू शकतो काय? 5 जर चंद्र सुद्धा परमेश्वरासमोर प्रकाशमान नाही आणि तारेही त्यांच्या नजरेत शुद्ध नाहीत, 6 मग मानव तो काय, जो केवळ एक कीटक आहे— मानवप्राणी, तो तर केवळ अळीप्रमाणे आहे!” |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.