शास्ते 17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्तीमीखाहने केलेली मूर्तिपूजा 1 एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात मीखाह नावाचा एक मनुष्य होता, 2 तो आपल्या आईला म्हणाला, “तुझी अकराशे शेकेल चांदीची नाणी कोणीतरी चोरली असे तुला वाटत होते त्याबद्दल तू चोराला शाप देत होतीस ती चांदीची नाणी मीच चोरली होती.” तेव्हा त्याची आई म्हणाली, “माझ्या मुला, याहवेह तुला आशीर्वाद देवो!” 3 जेव्हा त्याने ती अकराशे चांदीची नाणी त्याच्या आईला परत दिली, ती म्हणाली, “माझ्या मुलाने चांदीने मढविलेली प्रतिमा बनवण्यासाठी मी माझी चांदी याहवेहला समर्पित करते. मी ते तुला परत देईन.” 4 जेव्हा त्याने चांदी त्याच्या आईला परत केली, तिने दोनशे शेकेल चांदी घेतली आणि रौप्यकाराला दिली, जो त्याद्वारे मूर्ती बनवित असे. आणि ती मीखाहच्या घरात ठेवण्यात आली. 5 आता ही व्यक्ती मीखाहचे एक देवघर होते आणि त्याच्याजवळ एक एफोद आणि काही कुलदेवता होत्या आणि आपल्या पुत्रांपैकी एकाची त्याने पुरोहित म्हणून प्रतिष्ठापना केली. 6 त्या दिवसांमध्ये इस्राएलला कोणी राजा नव्हता; प्रत्येकजण त्याला योग्य वाटेल ते करत असे. 7 एक तरुण लेवी जो यहूदाह कुळातील यहूदीयातील बेथलेहेम नगरात राहत होता, 8 यहूदीयातील बेथलेहेम नगर सोडून राहण्यासाठी तो चांगलेसे ठिकाण शोधीत होता. प्रवास करत तो डोंगराळ भागात एफ्राईम देशातील मीखाहच्या घराजवळ आला. 9 मीखाहने त्याला विचारले, “तू कुठून आलास?” तो म्हणाला, “मी यहूदीयातील बेथलेहेम येथील एक लेवी आहे आणि मी राहण्यासाठी एक ठिकाण शोधत आहे.” 10 त्यावर मीखाह लेवीला म्हणाला, “तू माझ्यासोबत राहा आणि माझ्या पित्याचे आणि पुरोहिताचे कर्तव्य पार पाड. आणि मी तुला वर्षाचे दहा शेकेल चांदीचे नाणे, एकजोड कपडे आणि अन्न देईल.” 11 तो लेवी त्याच्यासोबत राहण्यास तयार झाला आणि त्याच्या पुत्रांपैकी एक असा तो राहू लागला. 12 तेव्हा मीखाहने लेवीला शुद्ध केले आणि तो तरुण त्याचा पुरोहित झाला आणि त्याच्या घरात राहू लागला. 13 आणि मीखाहने म्हटले, “मला माहीत आहे की याहवेह माझे कल्याण करतील, कारण हा लेवी माझा पुरोहित झाला आहे.” |
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.
Biblica, Inc.